गुरुवार, ३ जून, २०२१

अडकित्यात सुपारी अडकली जशी...

माझी आजी, आई आणि माझ्या सासूबाई देखील उत्कृष्ट गृहिणी म्हणून अत्यंत स्वाभिमानाने जगल्या, किंबहुना जगताहेत. आजी आणि आई उच्य शिक्षित असूनही का कुणास ठाऊक पण घरीच राहिल्या. त्याच घरातील मी, पुढल्या पिढीतली मुलगी, पण मूलभूत शिक्षण घेण्या आधीच कमवायला लागले. आणि तेव्हा पासून आज तागायत गाडी हळूहळू चालू आहे. गाडी म्हणण्या पेक्षा कसरत जास्त योग्य शब्द ठरेल.

आज पर्यंत उद्भवलेला प्रश्न पडलाय मला आता. तो असा कि मी सगळं धडपडत शिकले करायला कारण आधीच्या पिढीत कोणीच नव्हतं दिशा दाखवायला. नोकरी, घर, आला गेला, स्वतः, आणि बरच काही कस सांभाळायचं.

पण आता कळत नाही आहे कि माझ्या लेकीला कायच सांगू, नोकरी करण योग्य कि नाही? कदाचित एक पिढी लोटल्या नंतर माझ्या एवढी कसरत करावी लागणार नाही तिला, कारण कामात हि बदल झालाय, स्वभावातला फरक तर प्रचंड मोठा आहेच आणि आभाळ एवढी हुशार पिढी आहे हि, त्यामुळे हुशारीने आणि शिताफीने करतील सगळं. पण सल्ला द्यायची वेळ येते तेव्हा आणि ह्याच माझ्या पिल्लूचे लहानपणीचे दिवस आठवतात तेव्हा पोटात गोळा येतोच.

क्रमश:...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...