ह्याच आणि
माझं अगदी लहानपणी पासून घट्ट नातं आहे, अनेक वर्ष पासून. त्याची कारणे हि असंख्य आहेत. एक तर आम्ही तेव्हा नागपूर सारख्या शहरात राहात होतो आणि तिथला उन्हाळा अगदी जग प्रसिद्ध. त्यामुळेही आणि घरातली लहान असल्यामुळे, उत्साह भरपूर असल्यामुळेही "वायू शीतक" ची आवभगत, देखरेख हा माझा प्रमूख प्रांत होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे "वायू शीतक"का मध्ये पाणी भरल्यावर, वाळे ओले झाल्यावर, पडदे सरल्यावर जे समाधान वाटायचं ते अवर्णनीय असच आहे / होत. "वायू शीतक" उन्हळ्याच्या सुरवातीला बसवणं, त्याच्या टाकीला रंग मारणं, त्या भल्या मोठ्या टाकीत सकाळ संध्याकाळ पाणी भरणं, काही पाईपनी तर कधी बादल्या-बादल्यानी म्हणजे मोठंच काम असायचं. त्यावेळी वातानुकूलित यंत्रणेचं एवढं फॅड नव्हतंच, परवडणारही नव्हतं आणि "वायू शीतक"ची मज्जा आणि सर कुठे आहे त्या डब्ब्याला.
हा, तर आज माझ्या ह्या लहानपणीच्या दोस्ता बद्दल बोलण्याचं कारण असं कि माझ्या कचेरीच्या रस्त्यावर एक छोटेखानी भाजी वाल्याच दुकान आहे. दुकान कसलं, चार पत्रे ढोकलेत, बस्स. पण अनेक भाज्या दिसतात व्यवस्थित रचून ठेवलेल्या. खासियत म्हणजे त्या भाजी वाल्याने त्याच्या बसण्याच्या ठिकाणी, जेथे तो वजन करतो, पैसे देतो-घेतो तिथे स्वतः साठी चा एक "वायू शीतक"लावला आहे. आवडलं मला, फारच. त्यामुळेच हा लेख प्रपंच आज. स्वतः ची काळजी घेणं कित्ती आवश्यक आहे हे त्याने दाखवून दिले आहे.
बुधवार, २ जून, २०२१
"वायू शीतक"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा