गुरुवार, ३ जून, २०२१

डोळसपणा ...

माझ्या मताप्रमाणे कधीही संपणार काम म्हणजे घरचं काम.

माझी मुलं तशी सांगितले कि का-कू करत का होईना पण घरचं काम करतात, मला प्रचंड मदत झाली त्यांची माझ्या पायांचा किस्सा झाला त्यावेळी. पण एकच खंत आहे कि समोर उभी असलेली काम दिसत कशी नाहीत का डोळे झाक करतात कोणास ठाऊक. खूपच शिकण्यासारखं आहे ह्या पिढी कडून हे नक्कीच. जास्त अंगाला लावून घेत नाहीत, भार वैगैरे तर नाहीच नाही.

मधे एकदा माझं बऱ्याच समवयीन मुलांशी बोलणं झालं, कारण हि तस्संच होत. मी असं बघितलं आहे हे सगळ्याच गोष्टीं साठी नवी पिढी बाहेरच्या लोकांवर / ठिकाणांवर फार फार अवलंबून असतात. जस कि सुट्टीत बोर झालं कि बाहेरच जायचं, दुसऱ्या कोणीतरी काही सुचवायचं, करायचं. अस का?? मी त्या सगळ्या मुलांना सांगितलं कि सहसा आजकाल एका घरात जवळपास - खोल्या असतातच, बाल्कनी वगैरे धरून. पहिल्या दिवशी एका खोलीची धूळ साफ करायची, जमल्यास वस्तूंची जागा बदलायची वगैरे, दुसऱ्या दिवशी वेगळी खोली, असं जर करत गेलं तर कुठल्याही राहत्या घरी एक आठवडा संपला कि पुनश्य हरिओम, पुन्हा पहिली खोलीची वेळ येतेच. त्यानंतर काही पदार्थ केले, छोटे छोटे प्रयोग केले, छंद जोपासले, बागकाम केलं, बैठे खेळ खेळले, नुसतं दुसऱ्यांनी केलेला विडिओ बघण्या पेक्षा स्वतः तयार करावा, . तर का बोर होणार? असं म्हणतात कि पहिली शाळा म्हणजे घर, घराचं. आपलेपणाची भावना असणं आणि त्यावर कृती करणं फारच महत्वाचं आहे. बाहेर जरूर जा, पण घरची काम हि महत्वाची असतातच.

घर लख्ख असलं कि कस मन प्रसन्न राहतं, कळत व्यायाम होतो हे नक्कीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...