बुधवार, २ जून, २०२१

संगती संग...

विशेषतः माझे बाबा जेव्हा निवृत्त झाले त्यावेळी त्यांना मी सतत कामात व्यस्तच बघितलं. बाग काम ते घर काम आणि त्यानंतर बाहेरचे काम पण, अगदी आनंदानी करत राहायचे. कोणीही सांगता, हे महत्वाचं. दिसलं कि करायचं. नाही दिसलं कि शोधून काढायचं, म्हणायचे कसे, अगं हे शरीर नामक इंजिन चालू राहील पाहिजे म्हणजे जास्त देखभाल / मशागत करावी लागत नाही त्याची. असो. तर पावसाळ्यातील सगळ्यात आवडीचं त्यांचं काम म्हणजे कपडे उलट-सुलट करणे. हवेत आर्द्रता असल्यामुळे लवकर वाळत नाहीत कपडे आणि त्यावेळी आधुनिक धुलाई यंत्र हे नव्हते. तर काल काय झालं कि आमच्या मावशी उशीरा आल्या, कपडे लावले (त्यांच्या भाषेत मशिनीत) पण अगदी शेवटच्या क्षणी दिवे गेले. मग काय रात्री उशिरा दिवे आल्यावर मी आणि मुलांनी मिळून वाळत घातले खरे कपडे, पण आज सकाळ पर्यंत सुद्धा आंबट ओले होतेच. मग मी कित्येक वर्षांनी कपडे उलट-सुलट केले आणि मला बाबाची प्रकर्षाने आठवण झाली.

हे करतांना मला अजून एक जाणवले कि कपडे वाळत घालायचं जो स्टॅन्ड असतो त्यात बरेच रकाने असतात आणि जवळ जवळ कपडे घातले जातात. आणि त्यात आता मोठ्या मुलांचे कपडे जागा व्यापतात मोठी. तर शेजारचा कपडा जर जास्त ओला असेल तर त्याचा परिणाम होते आजूबाजूच्या कपड्यांवर, ते हि जरा ओलेच राहतात. अस्संच काही माणसाचं देखील असतं ना, कि आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतोच. नको व्हायला पण बरेचदा नकळत होतोच. संगती संग..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...