बुधवार, २ जून, २०२१

Your work should speak about you, not you...

तर आज असच काहीस झालं बरं का मंडळी. रिमझिम पाऊस येत होता, मी आरामात गाडीत बसून रास्ता निहाळत होते आणि रेडिओ वर पंडित संजीव अभ्यंकर गात आणि गप्पा मारत होते. पर्वणीच जणू.

मुलाखत घेणारा वैविध्य प्रश्न विचारात होता गाण्याच्या संदर्भात आणि पंडितजी त्याची उत्तरे बोलून आणि गाऊन देत होते, अतिशयच उत्साहाने. ज्यावेळी हा कार्यक्रम चालू होता तेव्हा मी इतकी मग्न झाले होते कि तेव्हा खास लक्ष गेले नाही. पण कार्यक्रम संपल्यावर किंबहुना कचेरीत आल्यावर जाणवलं कि प्रत्येक तान, मात्रा किंवा गाण्याची छोटीशी झलक जे ते गायले ते इतकं परिपक्व होत कि ज्याला तोडच नाही. जबरदस्त, भन्नाट.

माझे आई वडील नेहेमी सांगायचे ह्या बद्दल कि "Your work should speak about you, not you...", तसेच मी माझ्या घरच्या मुलांना आणि दारच्या मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना हि असच सांगत असते सतत.

पंडितजींना कधीच बोलावं लागत नसणार कि मी किती तास रियाज करतो कारण ते स्पष्ट अनुभवायला मिळतंय प्रत्यक्ष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...