बुधवार, २ जून, २०२१

अफलातून...

आम्ही २००५ साली सकाळ नगर चे रहिवासी होतो. सकाळनगर च्याच पुढे / समोर पोलिसांचं प्रशिक्षण केंद्र, कचेऱ्या, घर आहेत. त्या पोलीस वस्तीत राहणाऱ्या, काम करणाऱ्या बरीच महिला पोलीस भाजी, किराणा, औषध वगैरे घ्यायला दुकानात यायच्या. मीही त्याच दुकानात जात असल्यामुळे आणि माझ्या बडबड्या स्वभावामुळे माझी त्यावेळी बरीच जणींची ओळख झाली होती. आणि महिला पोलीस म्हटलं कि मला जामच वेगळं वाटत. तर त्यात एक खास काकू पण होत्या म्हणजे सगळ्यत मोठ्या, आणि मला फारच आवडायच्या. कारणे अनेक होती पण महत्वच म्हणजे त्या मोटोरसायकल चालवायच्या अगदी थाटात. एक वेगळच व्यक्तिमत्व....

सकाळ नगर सोडल्यावर कधीतरी त्या दिसायच्या रस्त्यात जाता येता.

इतक्यातच कळलंय कि त्यांनी म्हणे आमच्या कचेरीकडे घर बांधलंय स्वतःच. आणि अजूनही त्या त्याच कडक शिस्तीत इतक्या लांब त्यांच्या मोटोरसायकल वर जा-ये करतात. अफलातूनच.

त्यांचं सातत्य असच टिको, त्यांची प्रकृती अशीच ठणठणीत राहू दे आणि त्याच्या कडून असंख्य जणांना प्रेरणा मिळू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...