आमच्या आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाने एवढ्यातच एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे खास शिक्षक वर्गासाठी. आमचे विश्वविद्यालय सततच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्या साठी बरेच उपयोगी शैक्षणिक कार्यक्रम करतच असते त्यापैकीच हा एक खास. ह्या सगळ्याची मांडणी आखणी करणे, प्रत्यक्षात हे राबवणे ई. एक चमू करते. त्या चमूची मुख्य आणि माझी गाठ-भेट झाली. त्यात तीने अनेक अप्रतिम किस्से आणि आठवणी सांगितल्या. त्याच इथे देत आहे. ह्या उपक्रमाचा अवधी तब्बल १० दिवसांचा आहे. अनेकविध संस्थेतून शिक्षकवृंद येतात. एक छान संघ तय्यार होतो, ओळखी होतात, कदाचित नातीही उदयाला येतात.
एक संघ म्हणे १४ फेब्रुवारीला वर्गात आला. मुख्य मॅडम आणि एक आमच्याच विश्वविद्यालयाचे मान्यवर सर मिळून तो वर्ग घेणार होते. तर ह्या उपस्थितांनी काय केले कि दोन पुष्पगुच्छ आणले, सगळ्या उपस्थित पुरुषांनी मॅडमना तर मुलींनी सरांना गुच्छ देऊन आनंद साजरा केला. भन्नाट नं , अहाहा.
त्या नंतरच्या संघाने वूमन डे च्या दिवशी सगळ्या सरानी उत्साहाने सगळ्या मुलींसाठी केक आणला, वर्गणी काढून.
त्या पुढील महिन्यातल्यासंघाची गट्टी इतकी मस्त जमली होती म्हणे कि शेवटच्या चार दिवसात त्यांनी एकसारख्या रंगांचे कपडे घालून मैत्रीचे वेगळ्या पणाने दिवस साजरे केले, मस्त आठवण राहावी म्हणून.
प्रत्येक संधीच सोनं कस करायचं, आठवणी कश्या निर्माण करायच्या आणि पोटभर आनंद कसा घ्यायचा ह्याच हे अप्रतिम उदाहरण आहे, नाही का?
ऐकूनच इतकं प्रसन्न वाटलं कि मी निःशब्द झाले.
Narrated this tiny experience on my FB Timeline on July 9th 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा