गेले काही दिवस माझ्या मुलाला ताप
आलाय. एक दिवस त्यामुळे शाळाही बुडाली. आज सकाळी उठला तर जरा अंग गरम वाटलं. पण ताप नव्हता. तरीही सावधगिरी म्हणून तोच म्हणाला कि मी एक क्रोसिन ची गोळी जवळ ठेवतो. लागलीच तर घेईन.
त्यावरून मला
त्या दोघाचे लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी तर सर्दी ताप नित्यनेमाने यायचा. एकदा दिवस किंवा दोन दिवसाची सुट्टी असायची शाळेची त्यानंतर डब्या बरोबर लागलंच तर असावं म्हणून क्रोसिन किंवा तज्ज्ञांनी दिलेलं पातळ औषध, त्यावर प्लास्टिक ची पिशवी (छोटीशी) बांधलेली, चमचा ई. अशी वरात जायची शाळेला. मुलं लक्षात ठेऊन आवडीने घायचे औषध लागलच तर, कारण फळाचा स्वाद असायचा त्याला. शाळेच्या मावशी पण फोन करायच्या ताप वाटला तर. काम करणारी माझ्या सारखी आई असली कि कस मुलांना सगळं फारच लवकर मोठं व्हावं लागत. पण काय करणार. तर असे होते ते दिवस ज्याची मला खूप आठवण आली आणि सगळी चित्रफीत डोळ्यासमोरुन गेली.
त्याच बरोबर मला
माझ्या वडिलांचं एक वाक्य आठवलं, कधी त्यांना सांगितलं कि मला ताप आलाय तर ते म्हणायचे कसे "तापच आलाय ना, सं-ताप
नाही ना? मग झालं तर, निघून जाईल तो लवकरच, काळजी नको करुस." "संताप मात्र वास्तव करतो, जाता जात नाही"... ह्या वाक्याची आठवण म्हणून लेकालाही विचार नक्की काय झालाय ते.... मजा आली...
बुधवार, २ जून, २०२१
ताप...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा