बुधवार, २ जून, २०२१

मिठाचा मान...

का कुणास ठाऊक पण दररोज असंख्य वेळा मला माझ्या आई वडिलांनी सांगितलेल्या, त्यांच्या बरोबर अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येतेच. आज हि तस्संच झालं माझं. आज पुण्यात पालखी सोहोळा असल्यामुळे माझ्या मुलांची शाळा अर्धा दिवसच आहे. घरी आल्यावर पूर्ण जेवणार ते म्हणून मी छानसा वरण भात करून ठेवला आणि अर्थातच माझ्या डब्ब्यात हि आणला. हि पर्वणी कोण सोडणार, नाही का? माझ्या साठी वरण-भात-तूप-मीठ म्हणजे फार मोठी गोष्ट / पर्वणीच जणू. तर जेव्हा केव्हा रिकाम्या ताटलीत वरण-भात वाढायची वेळ यायची मला, त्या त्या वेळी माझी आई म्हणायची, "रिकाम्या ताटात आधी मीठ वाढावे आणि मग बाकी सगळे". "पांढरा भात रिकाम्या ताटलीत वाढू नये आधी" .

आज स्टील च्या माझ्या डब्ब्यात वरण-भात भरतांना प्रकर्षाने आठवण झाली मला आईची आणि माझे हात थबकलेच. आधी मीठ घातलं चिमूटभर, आणि मग वरण-भात.

आईने सांगितलेलं सगळं निमूटपणाने तेव्हाही ऐकलं आणि आजही पाळलं जातंय कळत / नकळत. त्या माउलीला मी कधीच "असं का?" हे विचारलं नाहीच. सांगितलेलं करायचं हेच माहीत होत. त्यामुळे आजही मला माहित नाही, किंबहुना त्याची गरजही नाही कि असंच का वाढलं जात पानांत. मिठाचा मान हा अनन्य साधारण आहेच. प्रश्नच नाही. आणि ते नेहिमी राहावं आयुष्यात म्हणूनही असेल कदाचित.

आठवणी--- जुन्या जपलेल्या गोड आठवणी.... बस अजुन काही नाही...

Narrated this Anukatha on FB's timeline on June 26th 2019.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...