बुधवार, २ जून, २०२१

उत्तम....


माझे वडील, त्यांचे काही निवडक मित्र, माझे काहीच नातेवाईक, मोजकेच मित्र / शेजारी ह्यांना कधीही विचार "कसे आहात " तर त्यांचं उत्तर ठरलेलं "उत्तम" (ठसक्यात बरं का). कधीच नाराजीचा स्वरही नाही हो. कसं जमत नाही ह्या लोकांना. धन्य आहेत सगळे.

तर ह्याच पठडीतील एक मला भावलेलं गाणं मी आज नव्याने ऐकलं. तस तर असंख्य वेळा ऐकून झालाय पण आज त्याची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली मला. कलंक चित्रपटाल गाणं आहे "बाकी सब फर्स्ट क्लास है..."

अरिजीत सिंग नावाचा गायक आहे गाणारा आणि तीनदा तो हीच ओळ म्हणतो "बाकी सब फर्स्ट क्लास है..." आणि त्यानंतर "कसम से..." असं लहेज्यात / ठसक्यात जे म्हटलंय त्याने, अहाहा. माईंड ब्लोईंग.

तसा मला हा गायक फारसा आवडत नाही कारण त्याची सगळी गाणी बहुतेक संथ गतीची आहेत. पण हे गाणं जरा मनापासून आणि हटके गायलंय त्याने, ह्याचा प्रत्यय आला मला आज.

https://www.lyricsbogie.com/movies/kalank-2019/first-class.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...