बुधवार, २ जून, २०२१

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.....

ह्याचा प्रत्यय मला रोज येतो. पाऊस सुरु झाल्यापासून जास्तच येतोय.

तर त्याच असं झालाय कि माझी सध्या विद्यापीठात रवानगी झाली आहे. विद्यापीठात जायचा जो मार्ग आहे तो घाट रस्ता आहे, जवळपास किलोमीटर असावा. त्या नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा असंख्य झाडे लावली आहेत, अगदी ओळीने. लावली आहेत का ती मूळची आहेत कोणास ठाऊक. पण आहेत. अनेकविध हिरव्या छटानी नटलेली ती झाडे. बहुतेक सगळ्याच झाडांना केशरी रंगांची फुले येतात. काही बोगनवेली पण आहेत, काही वेगळ्याच पांढुरक्या / राखडी / ढगाळ रंगांची पण फुले आहेत. तर अश्या हिरव्यागार झाडांच्या मुळाशी बऱ्याच रंगांची फुले जमिनीवर पडलेली असतात, दुतर्फा हेच दृश्य असत. सातत्याने गेली १० दिवस मी नवीन पावसाने भिजलेल्या मातीचा मंद सुगंध, हवेतला गारवा आणि त्यात ह्या संपूर्ण रस्त्यावर विखुरलेल्या विविध छटा अनुभवते आहे. मग काय विचारता, असं वाटतंय कि केवळ माझ्या साठी आणि त्या सर्व पंथ धारकांसाठीच ही झाडे अविरत स्वागताला उभी आहेत. इतकं अप्रतिम वाटत सकाळी कि जे शब्दात सांगणं अशक्य आहे मला. त्याना (झाडांना, पानांना, फुलांना, मातीला) देखील कित्ती आनंद आणि समाधान वाटत असेल नाही कि प्रत्येक दिवसाची सुरवात सगळ्याची इतकी अफाट होते त्याच्यामुळे. आणि हे जवळपास जानेवारी पर्यंत टिकत असावं सौंदर्य.

सातत्य आणि चिकाटी, अपेक्षा करता कशी टिकवायची हे कोणी ह्या सगळ्या झाडांकडून शिकावं असच आहे. कामाची सुरवात करतांना कित्ती हुरूप येतो अश्या नैसर्गिक देणगी कडे बघून. सगळ्या माझ्या हिरव्यागार मित्रांना, पावसाला, मातीला, फुलांना मनापासून धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...