बुधवार, २ जून, २०२१

पत संस्था / बँक....

काल फारच छान वेगळं / हटके काम करायला मिळालं. ते असं कि आमची मुलं / विद्यार्थी वेगवेगळ्या कंपनीत गेले होते सहा महिने काम करायला / शिकायला. ते तिथे नेमकं काय शिकून आलेत हे आम्हाला जाणून घ्यायचं होत. बसलो मग ऐकत. मज्जा आली, कारण विविधता होती त्यांच्या कामात, असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या होत्या कंपनीने आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचा लाभ घेतला.

तर त्यात एक काम असं होत (जे मुलांनी सादर केलं) खेड्यातील ज्या बँक / पतसंस्था असतात तिथे असलेल्या फॉर्मना भरण्यास मदत करणारं सॉफ्टवेअर. फॉर्म त्या त्या ठिकाणच्या मातृ भाषेत सादर होणार, बोलणार. जर एखाद्या अशिक्षित किंवा कोणालाही जर अडचण आलीच तर हे सॉफ्टवेअर हिंदी किंवा तिथल्या बोली भाषेत हवं तितक्या वेळा भाषांतर करून सांगणार. असो. छान विचार आहेत.

त्यावरून मला माझ्या भूतकाळात जाता आलं. माझ्या लहानपणी जेव्हा केव्हा माझ्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा तेव्हा चुकता, कंटाळता, विचारता, आणि प्रेरणा देत देत मला माझे बाबा कधी बँकेत घेऊन जायचे ते कळायचं देखील नाही. बरीच वर्ष हा नियम चालू होता. बँकेत गेल्यावर आधी मला थोडेसे व्यवहार सांगायचे कसे करतात ते,आणि त्यानंतर मी मागेही लिहिल्या प्रमाणे एका बाकावर / टेबला जवळ बसवायचे आणि ज्यांना गरज आहे त्याचे फॉर्म्स भरायला सांगायचे. नंतर नंतर मीच खूप उत्साहाने ते काम करत असे, सांगता.

जर सगळीच कामे संगणकाच्या मदतीने केली तर माणूस माणसापासून जास्तच दूर जाईल नाही का? एकमेकांची मदत घेणे, मदत करणे, संवाद साधणे वगैरे विलुप्तच होऊन जाईल / होत चाललंय आत्ताच.

प्रोजेक्ट ची कल्पना चांगली असली तरी संगणकाच्या संपूर्ण आहारी जाऊ नये म्हणजे मिळवलं. आपण माणसं आहोत मशीन नाही. त्यामुळे जरा माणसातच राहूयात. नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...