बुधवार, २ जून, २०२१

थोडसं दुर्मिळ पत्र ...

आमच्या आई प्रत्येक वर्षी मला वाढदिवसाचे पैसे पाठवतात चुकता. ह्या हि वर्षी पाठवलेत आठवणींनी. तर त्यांना नीट फोन वर ऐकू येत नसल्यामुळे मला वाटलं कि त्यांना पत्रच लिहावा धन्यवाद द्यायला.

माझ्या कडे काम करत असलेल्या अतीउत्साही मावशींना मी विचारलं कि मला इथे जवळपास पोस्टाच तिकीट कुठे मिळेल? कारण माझ्या कडे पाकीट आहे, कागद हि आहे, फक्त मला तिकीट पाहिजे. हे विचारण्याचं कारण म्हणजे आमच्या नागपुरात एक काका त्यांच्या दुकानात आणून ठेवायचे पोस्टाची तिकिटे. त्यामुळे मी विचारलं पण त्यांना काय ते झेपलं नाही अजिबातच.

मग मी कचेरीतल्या लोकांना कुरियर बद्दल विचारलं, ऑनलाईन संगणक वर काही सुविधा आहेत ज्या वापरून हि पत्र पाठवता येतात पण ते फारच पैसे मागत होते. आता आली का पंचाईत.

मग हेच मराठी टायपिंग टूल वापरलं, झकास पत्र लिहिलं, ते वर्ड मध्ये कॉपी केलं, त्याला छान सभोवती नक्षी काढली, रंगसंगती केली आणि माझ्या दिरांना मेल द्वारे दिलं पाठवून. त्यांना मग विनंती केली कि ह्याचे प्रिंट काढून आईंना द्या. पण ह्या सर्व महेनतीच फळ मिळालं मला. पत्र फारच आवडलं त्यांना आणि मुख्य म्हणजे मी पत्र लिहिलं हेच फार मोठ आश्चर्य Surprise / never expected होत.

शेवटी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...