रविवार, ६ जून, २०२१

"महिला वृत्तपत्र विक्रेत्या"

 मनाचा मुजरा ...

मला वृत्तपत्र वाचायला फार म्हणजे फारच आवडत. आवड असूनही रोज जमत नाही ह्याची मात्र खंत आहेच. त्यावर उपाय म्हणून मी नक्की शनिवार आणि रविवारचे वृत्तपत्र वाचते नक्कीच. आणि मला हातात धरून कागदी पेपरच आवडतो वाचायला जरी मी IT क्षेत्रात असले तरी, मोबाइल वर किंवा संगणकावर ती मज्जा नाही येत. असो.

तर आज शनिवार आणि मी जसा पेपर हातात घेतला वाचायला मला एक बातमी खूप आवडली आणि प्रचंड आश्चर्य ही वाटलं. सकाळ ह्या बातमीपत्र तयार करणाऱ्या कंपनीने काल "महिला वृत्तपत्र विक्रेत्या" चा जाहीर सत्कार केला. तो हि बालगंधर्व मध्ये, फेटे वगैरे घालून तब्बेतीत. एक म्हणजे ह्या अदभूत विचारालाच सकाळ ला सलाम. आणि मला खरंच हे माहित नव्हतं कि महिला ह्याही क्षेत्रात आघाडीवर आहेत. काही जणी तर म्हणे १७-१९ वर्ष झाले हे काम करत आहेत, अविरत. ऊन, वारा, पाऊस, थंडी ... कशा कशाची फिकीर करता हे काम करण म्हणजे हिंमत पाहिजे. भल्या पहाटे उठून, अंधारात एकटीने (कदाचित) घरून निघून, पेपर्स घेणे, वेगवेगळे करणे, वेळेत वाटणे... सहीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मुली / महिलांच्या सुरक्षेचं काय?? धैर्यवानच करू जाणोत अस.

वर्तमान पत्र फक्त गोळा करून, आणि वेगळे करून भागात नाही, त्यांना प्रत्येक घरात जाऊन वाटायचे पण असतात. मी सकाळी फिरायला जायचे तेव्हा आमच्या पेपर टाकणाऱ्या माणसाला बघितले आहे, प्रत्येक घर समोर गाडी उभी करायची, पेपर चा गठ्ठा घेऊन प्रत्येक घरासमोर त्यांना हवा तोच चुकता पेपर टाकायचं, पुन्हा गाडी काढायची आणि हे चक्र चालूच... दिसत तस एवढा सोप्पं नाही हे काम. एवढा केल्यावरही तो पेपर किंवा त्यातल्या बातम्या काही मिनिट ताज्या राहतात. फारच थोडकं आयुष्य आहे ह्या पेपर . त्या करता एवढा उहापोह वाट्णरांना आणि घडवणार्यांना सुद्धा. देवा.

मागील वर्षी आमच्या कचेरीच्या एक तास फक्त वाढला तर सगळी गडबड उडाली माझ्या वेळापत्रकात, ह्या कसचं सांभाळत असतील. अतिशयच मनापासून मला ह्या सगळ्या सख्यांना भेटायची इच्छा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...