रविवार, ६ जून, २०२१

काय वर्णू तव गुण, अल्पमती नारायण ....(पुन्हा एकदा)

माझ्या बाबतीत हे कदाचित एकदाच घडल होता असं वाटतंय मला. आम्ही जेव्हा कुठल्यातरी ट्रिप ला निघालो होतो आणि एक रात्र मुंबई ला राहावं लागलं होत. कारण दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे विमान होत. त्या हॉटेल वाल्यानी आम्हाला सोडल होता विमानतळावर. त्यावेळी का कुणास ठाऊक पण चालकाने पट्टाकिनी उतरून मला गाडीचे दार उघडले होते. मी गदगदलेच. काय करावं काय नाही अस झाला होता मला. देवा. कधी माहीतच नाही ना असं... असो...

आणि आजच एक दिवस, इतक्या वर्षांनी. वेगळ्यापणे गदगदणारा...

आजचा कॅब वाला जसा माझ्या कचेरीत थांबला तशी त्याने बहुतेक उडीच मारली आणि मला मागचा दरवाजा उघडला. बापरे, मला कळलंच नाही, (पुन्हा एकदा) कि मी काय करू. एकदम अचानक आकाशात उडावंसंच वाटलं. अहाहा कित्ती गोड अनुभव होता तो. कोणी तरी मला दार उघडतंय गाडीचं. मी अनेक कॅब मधून प्रवास केलाय पण असा अनुभव आजच आला बुवा. काही का असेना भलतीच मज्जा आली.

वाहन चालक हा प्रकारचं मला कधी माहित नव्हता. मीच माझी राणी घेऊन इकडे तिकडे हिंडायचे. मीच दरवाजा उघडायचे गाडीचा आणि बंदी करायचे. राजेशाही थाट माहीतच नसलेली मी, आज काल मात्र सगळं मनसोक्त अनुभवते आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...