"चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाच..."
लई भारी ओळ आहे हि. नाही का??
एवढ्यातच एक नवीन अमृततुल्य उघडलंय सुस गावात आणि त्यांची ही ओळ आहे. मला तर खूपच आवडली, म्हणून हे छोटस लिखाण.
मी तर अनेकदा हे अनुभवल आहे कि चहा करायला आणि प्यायला वेळ बरेचदा नसतो किंवा कमी पडतो. मी तर अनेकदा चहा हा घाईघाईत किंवा उभ्या उभ्याच घेते. कधीतरी क्वचित बसून आरामात प्यायला जातो. पण बॉडी क्लॉक एकदमच भारी काम करतो, चहाची वेळ झाली कि सहज सूचना देतोच. आणि त्यात मी ठरले शिक्षिका, मग काय विचारता, वर्ग झाला कि चहा मिळावा असंच वाटतं. थंडीच्या दिवसात तर विचारू नकाच. तल्लफ अजूनच वाढलेली असते.
खरंच ज्याने कोणी ह्या चहा
ला अमृततुल्य म्हटलंय त्याला सलाम. वेगळंच पेय आहे हे. तोडच नाही. चहाच्या वेळी तो लागतोच. सवयीचा परिणाम, अजून काय.
रविवार, ६ जून, २०२१
"चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाच..."
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा