काल
मी प्रसिद्ध नट "वैभव मांगले" ची मुलाखत ऐकली टीव्ही वर. त्यांच्या आयुष्याचे बरेसे किस्से सांगतांना त्यांच्या डोळ्यात बरेचदा पाणी आलं. अर्थात खूपच भावुक प्रसंग होते ते त्यात काही वादच नाही. माझ्या सारख्या ऐकणाऱ्याला सुद्धा आसू आवरता आले नाहीत तर त्यांनी काय काय भोगलं असेल प्रत्येक्षात हे कळणं फारच अवघड आहे. ते २००१ साली मुंबईत आले. खिशात थोडेसे पैसे होते, एक वेळ डब्बा लावला होता आणि सकाळी बिस्किटे पाण्यात बुडवून खायचे. दुसरा पर्यायच नव्हता. संपूर्ण मुंबईत जेथे कुठे काम असायचं तेथे तेथे पायीच जायचे, कारण काम महत्वाचं आणि वास्तव्य हि.
त्यानंतर बरीच नाटकं, सिनेमे, टीव्ही मालिका केल्या त्यांनी. चेटकिणीची जी भूमिका मिळाली त्यांना "अलबत्या गलबत्या" मध्ये त्याचे २९२ दिवसात २४० प्रयोग केले ह्या व्यक्तीने. एका दिवशी तर ५ प्रयोग झालेत. साष्टग दंडवत त्यांना. खरंच धन्य आहेत ते. खूप व्यक्तशीर आहेत, गाण्याची समज आहे, स्त्री भूमिका पण केल्या आहेत. फक्त १८ वर्षात ज्यांच्या नावातच लक्ष्मी आहे असे, त्यांनी वैभव प्राप्त केले आहे, नाव प्रसिद्धी मिळवून, स्वतःच घर, मुलं आणि हे सर्व मुंबईत, आणि नाटकासारख्या अस्थिर अश्या क्षेत्रात म्हणजे खरंच कमल आहे. भाग्याला नाकारून चालतच नाही पण तसे अपार कष्ट आणि सातत्य टिकवून ठेवावं लागत मग कुठलंही क्षेत्र असो.
माझे वडील नेहेमी म्हणायचे "काळजी करायची नाही पण काम इतकं सचोटीने करायचं कि काळांन जी जी करत तुमच्या समोर उभं राहील पाहिजे, कि बोल आता...." तेच अनुभवलं काल मुलाखत ऐकतांना वैभव शाली व्यक्तिमत्वची ....
प्रत्येकाला असच
वाटतं कि फक्त मीच काय ते अपार कष्ट करतो. पण ज्यावेळी वैभव मांगलेंची कथा ऐकतो, घरी काम करणाऱ्या काही बाईची व्यथा समजून घेतो, आणि कालच वर्तमान पत्रात बातमी वाचली कि एका १० वी च्या मुलीला मनगटापासून हात नाहीत, तर तिने मानेत पेन धरून सर्व पेपर्स लिहिले. असे आणि अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे दररोज न चुकता देवाला हात जोडाच, कि प्रचंड सुखात ठेवला आहेस आम्हला सगळ्यांना. तशीच कृपा सदा असू दे, सद्बुद्धी दे. "ठविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान".
रविवार, ६ जून, २०२१
वैभवशाली व्यक्तिमत्व ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा