मी FB वर मराठी मध्ये लिहीत असतांना खास, किंवा कुठलेही लिखाण असो मी online टूल्स / औजारांची मदत घेतेच. आजही घेतली गुगल बाबाची मदत. आजची महिला दिनाची ची जी थिम होती त्यात बॅलन्स हा शब्द होता. त्याला समानार्थी शब्द काय काय असू शकतात ते पडताळत होते. मला अशी अपेक्षा होती ह्या बहुआयामी आणि हुशार गुगल बाबा कडून कि तो वेगवेगळे समानार्थी शब्द देईल. पण कशात काय, डोंबलं. कोणत्या सॉफ्टवेअर इंजिनेर नी तयार केलाय हे पान कोणास ठाऊक. बॅलन्स म्हणजे काय फक्त शिल्लक हाच अर्थ आहे का? समतोल साधने, संतुलन, तोल, पेलणे , बाकी, इत्यादी.
तसेच लिंबू-चमचा हि शर्यत मी थोडी ट्विस्ट केली, त्यात नाविन्यता आणली. मला असं म्हणायचं होत. गूगल बाबा ला विचारलं तर म्हणतोय कसा ट्विस्ट म्हणजे पळवाट. म्हणजे काहीही. कुठल्या अर्थाने? ट्विस्ट ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ तसा पीळ, तिढा, मुरगळणे इत्यादी आहेत.
म्हणजे गुगल नेहेमीच योग्य असतो असं
अजिबात नाही. स्वतः हि सुज्ञ असणे आवश्यक आहेच.
रविवार, ६ जून, २०२१
सुज्ञ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा