शुक्रवार, ४ जून, २०२१

दिवस तुझे हे झुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे ...


काहीसा असाच प्रत्यय आला मला, एक भयानक पण जगावेगळाच अनुभव आला, पहिला-वाहिला असा.

त्याच अस झाला कि,

रस्ता तोच होता
अंतिम टप्पा तोच होता
गाडीही माझी तीच होती
माझ्या राणी बरोबर प्रवासही तोच होता
मीही तीच होते
रस्त्यावरच्या आठवणीही त्याच होत्या
अनेक वर्ष रोजची तीच वेळ होती
रेडिओ ऐकण्याची मज्जा हि तीच होती
पण आज काहीतरी पहिल्यांदाच वेगळं होत
गाडीवान वेगळा होता.

मोठा च्या मोठा गोळा आला माझ्या पोटात. कधीही म्हणजे कधीही आम्ही आमची गाडी चालवण्यास चालक ठेवला नाहीच, गरजच नव्हती. कारणे अनेक आहेत, आम्हा दोघांनाही छान गाडी चालवता येते, मी तर वाटच बघत असायची कि कधी माझी राणी आणि मी एकत्र आनंदाने कचेरीत जातो. पण आता केवळ माझ्या पायां मुळे मला पगारी-चालक ठेवावा लागला. काय काय विचार येऊन गेले मनात माझं मलाच माहित. पण शांत पणे ह्याचाही अनुभव घेतला. मज्जाही येत होती विचार केला तर, पण इतक्या ऐशो आरामाची सवय नसलेली मी, कुणाची वाट पाहणे वगैरे तर माझ्या खिजगणतीतच नाही, त्यामुळे मिश्र प्रतिक्रिया होत्या. पण असो. चांगली चालवली गाडी शोफर ने आज. जर मी पूर्ण वेळ त्याला नियुक्त केला तर तो काय करेल दिवस भर हेच कळत नाही आहे मला. असो, बघू. उद्याच उद्या बघू.

दिवस माझे हे आनंदानी जगायचे,
मागच्या आसना वर बसून प्रवास करायचे ....

Experienced this on May 28th 2019.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...