शनिवार, ५ जून, २०२१

आवडलेली डॉक्टर

वाखाणण्यासारखी गोष्ट दृष्टीपथात पडली आज, त्यामुळे लिहायचं ठरवलं.

आज अतिआवश्यक असल्यामुळे एका नवीन डॉक्टर च्या क्लिनिक ला गेलो. आमची नेहमीची डॉक्टर आज उपलब्ध नव्हती, त्यामुळे नवीन शोधावी लागली, अनायासे आढळली आणि अतिशय उत्कृष्ट अनुभव पण आला.

एक तर अपॉइंटमेंट घेताना व्यवस्थित स्टाफ, एस एम एस मिळाला, सगळी माहिती तपासली आणि पटली देखील, फोटो छान होते आणि फी माफक, गोळाबेरीज, गेलो आणि प्रेमात पडलो.

सर्वप्रथम स्वछ भरपूर उजेड असलेलं क्लिनिक, स्टाफ वेलकमिंग आणि एक विशिष्ट वेगळा गणवेश घातलेला, मितभाषी डॉक्टर, भयानक स्पीड तपासायची आणि बोलण्याची पण व्यवस्थित आणि मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे डॉक्टर नी पण सेम गणवेश घातला होता. वेगळेपण जाणवलं मला. नाहीतर डॉक्टर थोड्या स्टाफ शिवाय वेगळ्या दाखवण्याचा प्रयन्त करतात कित्येकदा. उच्चशिक्षित, प्रचंड यंग, अतिशय साधी आणि चुणचुणीत, कुठेही पसारा नाही ई.

थोडसं विषयांतर: आमच्या शेजारीच एक डॉक्टर मॅडम आहेत. त्या सहज बोलतांना म्हटल्या होत्या कि आम्ही ४० जणी होतो एका वर्गात, त्यात ४ जणींनी दवाखाना सुरु केला आणि आता फक्त मी एकटी प्रॅक्टिस करते आहे.

क्लिनिक उघडणं सोप्प आहे पण ते टिकवणं आव्हानात्मकच. ह्या आजच्या डॉक्टर कडे बघून लक्षात आलं कि तिने आव्हान फारच उत्कृष्ट निभावलं / पेललं आहे. अजून एक गोष्ट भावली ती अशी कि माझ्या लेकीने उपलब्ध असल्यामुळे आणि आजकालची ट्रेंड असल्यामुळे रिव्हियू चेक केले. त्यात अगदी ५ स्टार रेटिंग होती, बहुतेक सगळ्यांनी चांगलच लिहिलं होत, पण काही नाराजीचे सूर पण होते. आणि त्या नाराज लोकांची ह्या डॉक्टरनी माफी मागितली आणि त्यांना / बाकी कोणालाच असा अनुभव येणार नाही ह्याची खात्री दिली. भावलं मला. म्हणून हा छोटेखानी पंक्ती प्रपंच.

तर आजच्या उत्सवमूर्तीच नाव आहे डॉ पल्लवी अहिरे शेळके.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...