बुधवार, २ जून, २०२१

हार-फुले सुगंध आणि सौंदर्य....


नेहेमीच पूर्ण पूजा केल्यावर मला जाणवतच पण आज जरा प्रकर्षाने जाणवलं कि माझे देवघरातले देव कित्ती गोंडस दिसतात ताजे हार, फुले वाहिल्या वर. त्यानंतर उदबत्ती कपूरचा तो सुगंध एक नवीन उत्साह नेहिमीच देऊन जातो.

गुरुवार म्हणून मी आज शुभंमकरोति म्हटल्यावर आणि आरती झाल्यावर करुणा त्रिपदी, "प्रसाद स्तोत्र", "अपराध क्षमा स्तोत्र" आणि सरते शेवटी "दिगंबरा दिगंबरा..." असं सगळं एकटीनेच म्हटलं. नाहीतर माझ्या शाळेच्या दिवसात सामूहिक सत्संग, आईच्या गाण्यांचा कार्यक्रम बहुतेक चुकता दर गुरुवारी होतंच असे आणि तेव्हा दुमदुमयचा दिगंबरा सर्वत्र. आज त्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या.

तो एकत्र भन्नाट निःशब्द करणारा सुगंध उदबत्तीचा+फुलांचा+कापराचा अहाहा, त्यात मोठ्यांनी आरती टाळ आणि खणखणीत आवाज... खूप वेगळेच दिवस होते ते. आज एक झलक अनुभता आली.  

आजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु  

असं झाल थोडक्यात मला आज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...