एकदा घरी
कोणी तरी
जेवायला येणार होत
म्हणून मी माझ्या वेद ला सांगितलं हार फुले वाहायला आणि दिवा लावायला. हार घातले त्याने व्यवस्थित. पण माझ्या कडे जरा जास्तच देव आहेत, त्यामुळे फुले खूप लागतात वाहायला. त्यादिवशी कदाचित हार वाल्याने थोडी कमी दिली होती फुले, मग काय वेदला पडला ना यक्ष प्रश्न कि आहेत ती फुले कुठल्या देवाला वाहायची?
आपण
धूपार्तीच्या वेळेला पाकळ्या देतो अक्षते बरोबर ते पट्ठ्याने कुठे तरी लक्ष्यात ठेवलं असावं तर म्हणतो कसा मी फुल तोडून पाकळ्या वाहू का? म्हणजे पुरतील सगळ्यांना? फार फार आवडलं मला त्याच विचार करणं, आणि जेव्हा जेव्हा मी हार बदलते, फुल वाहते त्या त्या वेळी प्रकर्षानं मला वेद ची आठवण येतेच. अगदी छोटीशी गोष्ट आहे पण स्मित हास्य उमटतच, न कळत, अगदी प्रत्येक वेळी न चुकता.
बुधवार, २ जून, २०२१
यक्ष प्रश्न
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा