काल
पासून ज्याची प्रतीक्षा होती तो आला आणि त्याने जिंकलं...
जबरदस्त व्यक्तिमत्व. आमच्या श्रुतीने तिच्या सुमधुर आवाजात त्याची ओळख
करून दिली, अप्रतिम, प्रसिद्ध, तरुण, भारदस्त व्यक्ती RJ संग्राम.. सगळ्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पर्वणीच होती आज. संग्राम ने आज पर्यंत अनेक शिखरं स्व कर्तृत्वाने पार केली आहेत, अनेक पुरस्कार हि मिळवले आहेत. तर अशा संग्राम ची रणधुमाळी सुरु झालेलं एका प्रश्नाने. त्याने विचारलं सर्व श्रोत्यांना कि असा कुठला प्रश्न तुम्हा सर्वांना अजून अनुत्तरित आहे, किंबहुना शाळेत ह्या बद्दल शिकवलंच गेले नाही. ताबडतोब उत्तरांची सरबत्ती सुरु झालीच. हि नवीन विद्यार्थ्यांची पिढी फारच हुशार आहेच, पटापट विविध उत्तर दिली हि पण संग्राम नी सगळीच खोडून काढली, हशा पिकवला, भन्नाट मराठीत त्याच वाकचातुर्य दाखवून दिल. हार्डवर्ड विश्वविद्यालयात संशोधन झालेली एक महत्वाची गोष्ट हि सांगितली ज्यात प्रत्येकाचा आनंद कसा महत्वाचं आहे, किंवा प्रत्येकाने आनंदाने राहणे कस गरजेचं आहे हे समजावून सांगितलं. माणूस आणि जनावरतील फरक काय आहे हे हि विचारलं सगळ्यांना. सगळयांनी उस्फुर्तपणे भाग घेतला आणि भरभरून उत्तरे दिली. प्रचंड आणि विविधांगी वाचन आहे संग्रामच, स्पष्ट दिसत होत.
असा
आठवणीत साठवण्यासारखा दिवस होता आज संग्राम मुळे आणि अर्थातच SIT ची अविरत काम करणारी चमू, ज्यांच्या मुळेच आम्हा सर्वांना संग्राम ला पाहता आणि ऐकता आलं. असा असावा Induction चा एक दिवस, भन्नाट.
बुधवार, २ जून, २०२१
धून बदलके तो देखो...(Marati)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२४६४: तळ गाठणे
आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा