बुधवार, २ जून, २०२१

तर आज अस्सं झालं...


माझ्या कचेरीच्या वाटेवर एक नवीन शाळा सुरु झाली आहे. त्या शाळेची मुले एकतर बस नी येतात किंवा त्याचे पालक त्यांना सोडतात. हे आमचं रोजच निरीक्षण आहे. आज काही बसना बहुतेक उशिरच झाला होता आणि त्यामुळे रस्त्यावर जरा गोंधळच होता. असो. त्यात एक गाडी पण लावतांना गडबड होत होती . खूप गडबड चालली होती. त्यात आमची गाडी बराच वेळ त्या शाळेसमोर थांबली हे सगळं होईस्तोवर.

मला दोन इतक्या गोडस जुळ्या मुली दिसल्या, कित्ती तो गोड गणवेश, त्यात अप्रतिम दप्तरं, क्लिपा, बापरे, (बहुतेक) त्यांची आईच होती त्यांना गाडीतून उतरवण्यास मदत करत होती आणि त्या तिघीही जणी व्यवस्थित उतरल्यावर धडपडत गाडी नीट लावत होत्या त्या त्यांच्या आजी असाव्यात कदाचित. भन्नाट होत ते दृश्य, आजी शाळेत सोडायला येणं म्हणजे पर्वणीच, नाही का?.

इतक्या उत्साही गोड पिल्लाचं रहस्य म्हणजे आई-आजी असाव्यात, अर्थात तसं दिसत तर होत.

Girl power rocks, made my day already !!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...