हे खरं आहे सर्वच बाबतीत, नाही का?
माझ्या पायांच्या प्रकरणामुळे आणि
बदलीही झाली असल्यामुळे मी कधी नव्हे ते वाहन चालक ठेवला आहे. आयुष्यात कधीच ज्याची कल्पनाही केली नव्हती ते सध्या करते आहे.
मला
एक खात्री होती वाहन चालक म्हणजे तीक्ष्ण नजर हे मी ऐकलं पण होत आणि मी स्वतः गाडी शिकत असतांना माझ्या प्रशिक्षकाने सांगितलं पण होत आणि त्याचा सराव हि करून घेतला होता.
तर हा जो माझा सध्याचा वाहन चालक आहे त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिशा कळतंच नाही उजवी डावी, रस्त्या वरच्या दुकानांच्या खुणा, पेट्रोल पंप काही म्हणजे काहीच कसं दिसत नाही त्याला अजिबच आहे बाबा तो. इतका हळू रेडिओ लावतो देवा कान घातला तरीही ऐकू येत नाही. आणि ते हि कुठले तर बाबा आदमच्या जमान्यातली गाणी हे राम... कधी कधी ठीक गतीने चालवतो नाही तर मुंगीही पुढे जाते आमच्या, अरे देवा.
पण आता काय...
आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनिया ।।
मग तो कृपासिंधु निवारी सांकडे । येर ते बापुडे काय रंक ।।
भयाचिये पोटी दुःखाचिये रासी । शरण देवासी जाता भले ।।
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता । चिंतावा तो आता
विश्वंभर ।।
Read more at: https://www.mymandir.com/p/QrQBsc
दुसरा वाहन चालक बघितला तर तो ह्याही पेक्षा भलता असू शकतो, त्यामुळे 15-२० मिनिटे मी दीर्घ श्वास घेत बसलेली असते इकडे तिकडे बघत, पाऊस पाणी हिरवळ ई चा आनंद घेत घेत घर / कचेरी कधी येते हे कळूच देत नाही....
त्याला कोणी गाडी चालवायला शिकवली आहे
कोणास ठाऊक....
त्यातहि इतकी वर्ष झाल्यावर स्वतः काही तर बदल घडवून आणावा कि नाही?
साधं पाऊस पडायला लागल्यावर defrost कसा
करायचं हे हि माहित नाही, पंख चालू कर म्हटलं तर AC च बटन दाबतो, अस्स्स वाटतं न कि घ्यावीच हातात गाडी....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा