काही दिवसांपूर्वीची हि गोष्ट आहे. माझ्या घरी आमच्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. आमच्या घराला दत्त महाराजांच्या आशीर्वादामुळे ६ जण नवीन पिढीत आहेत, वैविध्य वयोगटाचे. त्यामुळे रुसवे फुगवे थोड्या वेळा करता होतातच. तर अश्याच एका रुसव्याची हि गोष्ट.
सर्वात छोटा उस्ताद साधारणतः ४ एक वर्षाचा असेल त्या वेळी. आणि तो काही कारणांनी रडत होता. मोठी मंडळी त्यांच्या गप्पात रंगली होती. मी आणि माझी जाऊ पडलो होतो त्या खोलीत. पण बाकी मुले त्याला समजावंत असल्यामुळे मी फक्त बघ्याची भूमिका घेतली. सर्व भाऊ बहिणींनी समजावलं त्याला पण तो रडायचं थांबत नव्हता. शेवटी माझा एक पुतण्या म्हणाला "अरे रडू नकोस. मी जेव्हा तुझ्या एवढा होतो ना तेव्हा माझ्या आई नी मला काय सांगितलं होता हे माहीत आहे का.... आयुष्य म्हणजे उतार -चढाव असतातच...(life is full of ups and
downs)".
हे वाक्य ऐकल्यावर बाकी सर्व इतके हसले कि रडू फुर्रकन उडूनच गेल. ४ वर्ष्याच्या पंटरला सर्व डोक्यावरून गेल्यामुळे त्यानेही रडणं थांबवल शेवटी.
बाप
रे, काय
प्रसंग होता तो... मस्त.
बुधवार, ९ जून, २०२१
"आयुष्याचे उतार चढाव..."
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा