बुधवार, ९ जून, २०२१

भ्रमणध्वनी यंत्र अर्थात मोबाइल फोन ह्याबद्दल थोड...

 माझ्या बस स्टॉप च्या वाटेवर, किंवा कचेरीत जातांना रोज रस्त्या वर बरीच लोक दिसतात, आणि अनुभवता येतात. त्यात सर्वां मध्ये असलेल साम्य जाणवल आणि गेले - वर्ष विचारच करत राहिले ह्याच उत्तर, अर्थात अजूनही आढळल / गवसल नाही.

तर माझ्या वाटेत मला सकाळी बरीच पालक मंडळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी बस स्टॉप वर उभी असलेली दिसतात. एकही जण उपवाद नाही हो, सर्वच्या सर्व आपआपल्या मोबाइल मधेच गुंग. शेजारी (कदाचित) त्यांचाच पिल्लू असले इतक गोजिरे, काही संवाद साधावा, ऐकावं बोलावं, पण नाही. जिवंत एक जण जवळ उभ आहे पण काही असर नाही अजिबात. हाः कुत्र्याला फिरायला जातांना सुद्धा सर्व लक्ष फक्त भ्रमणध्वनी यंत्र मधेच. सर्वत्र हेच दृश्य. काय संस्कार देतात हे सर्व जण लहान मुलांना?? माझ्या मते हे बरोबर नाही. एक वेळ ठरवूनच जर हात लावायचं ठरवलं ह्या भ्रमणध्वनी यंत्राला तर सहज शक्य आहे, चांगले संस्कार देणं आणि आपली मान / मणका सांभाळणं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...