एवढ्यातच सलग महिनाभर तबला ह्या वाद्याच्या अनेक वर्षांनी संपर्कात आले
आणि
मंत्रमुग्धच व्हायला झाले, शब्दांच्या पलीकडले असेच.
आज तब्बलजी च्या बाजूलाच बसले होते. तो तबला लावत होता काळी एक / दोन असं काहीस. नेहेमीच बघितलेली एक गोष्ट नव्याने जाणवली. ती अशी कि बिचाऱ्या तबल्याला कित्ती मार खावा लागतो तेव्हा कुठे हवे तसे बोल बाहेर पडतात आणि गाणं सुश्राव्य वाटतं. खास स्टील ची हातोडी असते तबला लावायची, वरून खालून अनेक वेळा मार खावा लागतो. वेगळेच special लाकडाचे ठोकले लावले असतात त्यालाही मारावा लागत. शाई लावावी लागते वेळोवेळी. त्याचं डोकं झाकावंच लागत, नाही तर बोल नीट वाजत नाहीत म्हणे. त्यात फक्त तबला सुराप्रमाणे बदलतो पण डग्गा तसाच राहतो. तो बिचारा सर्व तबल्यांना सामावून घेतो. नेहेमीच सहायक अशीच भूमिका घेतो. हलका हि असतो, मोठे पोट असते आणि जास्त मार हि नाही खात.
काही क्षणात हे विचार येऊन गेले आज. किती वर्ष तबला बघते आणि ऐकते आहे पण त्याकडे असं कधीच बघितल नव्हतं आणि विचार हि नव्हता केला. संपूर्ण आयुष्याचे सार आहे ह्यात. आयुष्य माणसाच असो नाहीतर तबल्याच.
हे सगळं अनुभवतांना आणि आता लिहितांना पाया कडे, दुखण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. आणि आनंद मिळाला तो शब्दापलीकडला. ह्या मंत्रमुग्ध क्षणांची, तालमय अनुभवाची आणि त्यामुळे रिलॅक्स झालेल्या पायाची, सगळ्यांची परतफेड कशी करावी? मला असं वाटतंय ह्या पुढे संगीताची साथ नाही सोडायची, "त्याची" भक्ती जमेल तशी करत राहायची, वाद्यवृंदासहित भजनं गात राहायची. जमवून घे रे सगळं, भिस्त फक्त तुझ्यावर आहे.
Wrote on FB on Dec 23, 2018, 8:17 PM.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा