रविवार, १३ जून, २०२१

भक्तीमय परतफेड (भाग १५)

मागील महिन्याच्या सुरवातीला एक नवीन WA संघ तय्यार झाला. त्यात माझे नाव अचानक आले आणि मी सहज सुचवले माझ्या आईच्या भाजनांन विषयी. त्यात एक छोटा गाणाऱ्यांचा आणि वादकांचा संघ तयार झाला, दर शनिवारी बैठक झाली, उजळणी झाली आणि काल दत्तजयंती निमित्याने आणि आज पारण्याच्या निमित्याने दोन कार्यक्रम हि झाले. खूप समाधान मिळाले. ज्याने सत्संग हा शब्द शोधून काढला आहे त्याला शतशः दंडवत. अनेक महिन्यांची ऊर्जा मिळाली. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे CD मध्ये गाणी आहेत माझ्या आईच्या आणि बरोबर फक्त तेवढीच लोक तयार झाली, जेव्हाकी २५६ जणांचा संघ आहे. हे छोटंसं कार्य आत्ताच होणार होतं हेच खरं. अगाध महिमा सर्वश्रुत आत्ताच व्हायचा होता.

अगदी भूपाळी पासून ते आरती पर्यंत सर्व आईची भजने गायचा वेगळाच अनुभव मिळाला. आज तर कहरच झाला. बावन श्लोकी गुरुचरित्र "श्री दत्त बावनी" कित्येक वर्षांनी पुन्हा आणि वेगळ्याच ठेक्यात म्हणण्याची संधी गवसली. किती सुमधुर स्वर ते. मुळात गुजराती मध्ये श्री. टेंभे स्वामींच्या शिष्यानी रचलेले मराठी अनुवादित, सुरात ठेक्यात जोशात म्हणणं हि एक पर्वणीच, नाही का? असं म्हणतात कि हि दत्त बावनी एकदा ऐकली कि बावन्न गुरुवार सत्संग केल्याचे फळ मिळते. श्री .टेंभे स्वामींनी अजून किती सोप करायचं साधना करणं?. आणि आजकाल YouTube च्या दुनियेत तर पाठ नसेल तरी ऐकता येत, कुठेही कधीही.

तर अशी हि सुमधुर भक्ती सतत चालू राहावी हीच दत्त चरणी प्रार्थना.

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

Dec 23, 2018, 7:52 PM, on this date wrote on my FB wall.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...