माझ्या कडे काम करणाऱ्या मावशीचा फोन लागत नव्हता. त्यांचे दोन दोन नंबर असून देखील ... जरा गम्मतच वाटली मला.
मग मावशी ज्या दुकानात काम करतात आणि त्यांचा मोबाईल टॉप उप करतात त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं कि नवीन सिम टाकलाय आणि नवीन नंबर पण आहे. माझ्या कडे मावशी आल्यावर मी विचारला, नवीन नंबर बद्दल. तर म्हणतात कश्या, हो तर, नवीन नंबर खूपच चांगला चाललाय, लिहून घ्या तुम्ही माझा नवीन "जीवाचा नंबर...". पुन्हा पुन्हा सांगत होत्या "जीवाचा नंबर...", "जीवाचा नंबर...". क्षणभर खरंच काही कळलं नाही. मी थोडंसं जे निमरोलॉजि मध्ये संशोधन केले आहे, त्या प्रमाणे मला "लाईफ नंबर" असतो हे माहित आहे. नंतर लक्षात आला कि त्या "JIO चा नंबर" असं म्हणत होत्या. देवा .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा