शनिवार, ५ जून, २०२१

एक उच्चशिक्षित असा अशिक्षित....


आज माझा एक सह-प्रवासी होता कॅब मध्ये. आम्ही त्याला घ्यायला गेलो तेव्हाच हा प्रसंग. त्याने दार उघडले "धाड - धूड". त्या नंतर लगेचच ड्राइवर शेजारची सीट खाडकन मागे केली, जस्सी कि ती कॅब त्याचीच आहे. अरे मागे कोणी बसलंय ह्याच तरी ध्यान ठेवावं. त्यानंतर अजूनच कहर केला त्या माणसाने. एक चित्रपट लावला. आणि तोंडासमोर मोबाइल धरून बघत बसला संपूर्ण वाटेत. अरे चालका शेजारी बसायचं असेल तर काही महत्वाचे नियम पाळावेच लागतात. सीट पट्टा लावणं नाही, अदब तर सोडाच कि आपण एक शेयर कॅब मध्ये आहोत. तो मोठ्या कंपनीत काम करणारा वाटला . कपडे बरे होते. म्हणजे चांगल्या घरातील असेल नक्की आणि चांगल्या शाळेतही गेला असावा. मग ह्या सगळ्या शिक्षणाचा काय उपयोग. पालथ्या घड्यावर पाणीच नाही का. सगळं मातीत, वाया.

चालक टॅक्सी चा कदाचित रात्रभर गाडी चालवत असेलही. कशाला नको ते चित्रपट बघायचे, त्याच लक्ष विचलित झालं म्हणजे कितीत पडणार सगळ्यांना. इतकं साधं कसं कळत नाही, शिकलेले म्हणे. विचित्र. काय मिळालं तो चित्रपट बघून कोणास ठाऊक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...