शनिवार, ५ जून, २०२१

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ....

लहान बाळ जेव्हा बसायला / रांगायला / चालायला लागत तेव्हा ते कधी त्याची दिशा बदलेल हे सांगता येतच नाही, अचानक बदलेल्या दिशेमुळे ते हि धडपडतात आणि त्यांच्या आजुबाजुचेही. ते असं का करतात, मज्जा म्हणून, का कुतूहल म्हणून का नकळत हे माझ्या साठी कोडंच आहे.

तसाच प्रकार आपली चार पायाची आणि एक शेपटाची मित्र मंडळी पण करतांना दिसतात रस्त्यावर, श्वान मंडळी हो. देवा, खरच अंदाज बांधता येत नाही, कधी कुठे आणि का दिशा बदलतील ते. रस्त्यावर गाडी चालवताना जरा संभाळावाच लागत. आणि ह्यांची पिल्लं तर विचारूनच नका.

आजकाल ह्या वर्गात अजून एकाची भर पडली आहे. हि अशी मंडळी आहेत ज्यांनी मोबाईलला स्वतः च्या अवयवांपेक्षा जास्त महत्व दिल आहे. बरेचदा असं आढळलं आहे कि इतके गुंग असतात मोबाईल विश्वात आणि त्यात काही अचानक आठवत असेल आणि मग काय झटकीनी दिशा बदल. अरे पण त्यामुळे गडबड होते नं बरेच जणांची. बर दुसऱ्यावर धडपडले तर मोबाईल मधेच लक्ष, पण तोंडात सहज एक शब्द सॉरी. बास. संपला विषय. काय राव.

माझ्या कचेरीत दोन गर्भवती महिला जेव्हा अश्या मोबाईल विश्वात गटांगळ्या खाणाऱ्या मधून त्यांचा मार्ग काढतात तेव्हा माझ्याच पोटात गोळा येतो भला मोठा. वेगळंच झालाय सगळं. आपल्यासाठी मोबाईल का आपण त्याच्या साठी हेच कळत नाहीय मला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...