शनिवार, ५ जून, २०२१

माणूस मोबाईल च्या आहारी

 एक दिवस माननीय प्रधान मंत्री पुण्यात आले होते, वास्तव्य केलं होत म्हणे. आम्ही पण त्याच दिवशी काही कामानिमित्त बाहेर पडलो होतो आणि रस्त्या वर ठीक ठिकाणी भरपूर पोलीस गणवेशात होते, नक्की माहित नाही पण आर्मी चा गणवेश घातलेले पण बरेच जवान पण होते, बरेच ठिकाणी. संपूर्ण बाणेर आणि विद्यापीठ रस्ता, त्यानंतर संपूर्ण विमानतळावर जाणारा मार्ग, सकाळी कडेच सुकाळ होता, सुरक्षेतीतेसाठी असेल.

काही जण त्यांच्या गाड्यांमध्ये बसेल होते, काही खुर्च्यांवर पण सावलीत होते, काही जण उभे होते, काही त्यांच्या दोन चाकी वाहनावर विराजमान होते वगैरे... कसे का असेना एकही उपवाद नव्हता, सगळेच्या सगळे मान खाली घालून मोबाईल मधेच गुंग होते. आशा करते कि ते कामासंबंधीच वापरात असतील त्यांना दिलेला स्पेशल मोबाइल. पण तस नसेल तर मात्र हे फारच भयानक / भयावह चित्र होत. त्यांना खूप तासाची सेवा द्यावी लागते हे मान्य आहे मला, शेवटी माणूसच आहे म्हटल्यावर मित्र, परिवाराशी संपर्कात राहणे महत्वाचे आहेच पण मान मोडेस्तोवर आणि सगळेच. अशी खाली मान घालून भर रस्त्यावर सतत नुसतं बसून राहील तर आरोपी कधी फरार होईल हे कळणार देखील नाही, किंवा नियम तोडणे सहज शक्य होईल माणसांना.

मोबाईल हा फक्त गरज असेल तेव्हाच का नाही वापरला जात, किंवा प्रत्येक जण एक वेळ का नाही ठरवून घेत मोबाइल वरचे निरोप किंवा अजून काही बघण्यास. दुसऱ्याच जाऊ दे, पण स्वतःच नुकसान होत आहे, हे कस समजत नाही कुणास ठाऊक. आणि हे नुकसान शारीरिक, मानसिक, आर्थिक, सगळ्याच प्रकारचं आहे. नाही का.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...