मी सध्या प्रशिक्षणा साठी आमच्याच एका वेगळ्या कार्यालयात जाते आहे. अजूनही बरीच मंडळी आहेत त्या कार्यक्रमासाठी. त्यात माझी एक मैत्रीण पण आहे. ती अमराठी आहे. काल मी आणि तीच होतो जेवण झाल्यावर कार्यक्रमाच्या खोलीत आणि एक चपराशी काका आले वातानुकूलित यंत्रणा चालू करण्याकरता. माझ्याशी ते मराठीत बरच काही बोलत होते. त्यात मधेच माझी अमराठी मैत्रीण काही तरी हिंदीत बोलली त्या काकांशी. त्याच उत्तर म्हणून आणि त्यांना कळलं कि ती मराठी नाही तेव्हा अस्खलित इंग्लिश मध्ये खडखडा बोलले ते काका चक्क. अहाहा. इतकं भन्नाट होतं न ते, बघायला आणि ऐकायला ही मस्तच. फारच वयस्कर होते ते काका आणि त्यांच्या काळी इतका इंग्रजीच बडगा असेल असं वाटत नाही. त्यामुळे जेव्हा मी विचारलं तेव्हा म्हणतात कसे, सगळ्या बाहेर देशातून आलेल्या विद्यार्थासी बोलायचं म्हणजे त्यांची भाषा यायलाच हवी हो मॅडम. नाही का?? असलं बर वाटलं म्हणून सांगते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा