शनिवार, ५ जून, २०२१

पदर ...

आईच्या साडीचा पदर किंवा आधुनिक पदर म्हणजे चुन्नी / ओढणी पंजाबी ड्रेस वर घातलेली. तर हा पदर कोणत्याही आकारात / प्रकारात असेल तरीही अत्यंत महत्व पूर्ण आहे. आणि बहुउपयोगी असाही. काय काय लिहू आणि काय नाही अस्सं झालाय मला. अर्थात मी माझेच अनुभव लिहायचं ठरवलं शेवटी. अजूनही माझ्या मुलांचं बालपण चांगलंच आठवत मला त्यात माझी ओढणी म्हणजे त्यांची साडी होती. सगळ्या जमतील तेवढ्या ओढण्या काढून, गुंडाळून घरभर फिरायचे, काय अप्रूप वाटायचं त्यांना पण विचारूच नका. झकास असा अनुभवच. आणि दोघेही करायचे हं.

त्यानंतर लहानपण म्हणजे सर्दी, हे माझे एक समीकरणच होते. आणि नाक पुसायचं म्हणजे फक्त मम्माचा ड्रेस आणि त्यातल्या त्यात हवेत उडणारी चुन्नीच होती. अगदी सहज उपलब्ध आणि खात्रीशीर.

चारचाकीतून जातांना लहान असतांना वातानुकूलित यंत्रणा चालू झाली रे झाली कि डुलकी घ्यायचेच मुलं. आणि बरेचदा ऊन असायचंच. त्यामुळे ओढणी पडदा पण व्हायची, कधी ते कळलंही नाही कधी. आपोआप घडायचं ते, पट्टाकिनी, कुठलाही विचार करता. अहाहा.

विविध रंगांचे घरात कानाकोपऱ्यात ठेवलेले पंचे असायचे पण ओढणीच वापरात यायची, साधं तोंड पुसायला, कधीही. हक्काने. कित्येक वर्ष. सातत्याने.

आज हे अचानक लिहिण्याची दोन कारणे आहेत. आज आमच्या ट्रैनिंग मध्ये ज्या वरिष्ठ मॅडम आल्या होत्या त्या त्यांच्या चुन्नीचा बरेचदा उपयोग करत होत्या चेहेरा पुसायला. आणि दुसरं कारण म्हणजे इतक्यातच आमच्या सिंबायोसिस इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये पदवीधर म्हणून बाहेर पडणाऱ्या वर्गाचे फोटो काढण्यात आले. तेव्हा ऊन खूपच होत. माझी एक सखी साडी नेसून आली होती, दुसरी नाही. तेव्हा पदराची टोपी झाली आणि वेगळीच मजा आली.

मीही लहान असतांना माझ्या आईचा पदर असाच असंख्य वेळेला पोटभर वापरला होता. ती तर नेहेमीच साडी नेसायची. त्यामुळे अलभ्य लाभच मला. अहाहा काय दिवस होते ते.

पण आता आधुनिक मातांना कदाचित वेगळा रुमाल किंवा तत्सम काही तरी आठवणीने घेऊन जावंच लागत असेल नेहेमीच. नाही का? कारण त्यांच्या नवीन पोशाखात तर चुन्नी नाही त्यामुळे अनुभव जरा वेगळे असतील एकंदरीतच.

मुलांबरोबर मी कधी मोठी झाले कळलंच नाही, आणि खूप खूप लवकर निसटले ते गोड दिवस हातातून. पण अतिशय अद्वितीय आठवणी ठेवून गेलेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...