बेबी पावडरचा सुगंध हा माझ्यासाठी एक अनोखा असा आहे, ताजेतवाने करून जाणारा, नेहेमीच.
जानेवारी पासून खूप
नियमित पणे
मी एक थेरपी घेते आहे माझ्या पायां करता. त्याच नाव आहे मॅट्रिक्स रिथम थेरपी. हे मशीन चालवायच्या आधी व्यवस्थित पावडर लावावी लागते. आणि कुणास ठाऊक पण माझी डॉक्टर बेबी पावडर वापरते. अहाहा काय वेगळाच सुगंध अनुभवयाला मिळतोय कित्येक वर्षांनी आणि मन प्रसन्न होत. ट्रीटमेंट / उपचाराचा हि उपयोग नक्की होतो पण पावडर च्या सुगंधाने होणारी सुरवात काही औरच. त्यात पावडर कशी पसरवायची हे हि महत्वाचे आहे म्हणे, त्यामुळे माझ्याशी डॉक्टर चे जुळणारे नाते (connect) हे शब्दात मांडण्या पलीकडले आहे. किती नशीबवान मी, लहानपणी आईने लावलेली पावडर तर मला आठवत नाही अजिबात, म्हणजे शक्यच नाही ते, पण मला अजून एकदा बेबी पावडर कोणी तरी लावण्याचा आनंद उपभोगता येतोय.
गुरुवार, ३ जून, २०२१
पावडर...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा