माझ्या लहानपणी रोजनिशी हा एक अविभाज्य घटक होता, शाळेत वहीच्या स्वरूपात तर घरी आठवणींच्या वेशात. दररोज घरी सर्वांच्या लवकर आंघोळी झाल्या कि कपडे भिजत घालणं हे एक सुंदर काम असायचंच, नं चुकता नं सांगता नं कंटाळता करायचंच. आज कळतोय त्याच्यातला आनंद आणि बरंच काही. सर्व प्रथम रंगीत आणि पांढरे कपडे वेगळे करायचे. त्यानंतर पांढरे गरम पाण्यात आणि रंगीत थंड साबणाच्या पाण्यात भिजवायचे, शिस्तीत. आणि हे सर्व रोजचे कपडे बरं का, नवीन / बाहेर घालून जायचे त्यात नाहीत, ते सर्व आपआपले शनिवार / रविवारी धुवायचे. ह्यात अप्रतिम व्यायाम व्हायचा नकळत, शिस्त लागायची, वेळेचा नियोजन कळायचं, भूक मस्त लागायची, आणि झोप तर विचारूच नका. अंगवळणीच पडलं होतं सगळं. आणि आता, Washing-Machine ह्या उपकरणामुळे सोय झाली खरी पण .....
स्वतःच्या हातांनी धुतलेले कपड्यांना काय
एक वेगळाच सुगंध असायचा. आज सारख्या सुगंधी पावडरी नव्हत्या तेव्हा, पण एक प्रचंड समाधान मिळायचं, काम म्हणून मी तरी नव्हतं बघितला त्याकडे कधी. माझं तर कधी / बरेचदा गाणं गुणगुणत धुणं आणि वाळत घालणं चालेल असायचं, शब्दात नं मांडता येईल अशी वेगळीच गम्मत होती त्यात. धुण्याचा दगड दुर्मिळच झालाय आजकाल शहरी भागात. असो.
"लहानपण देगा देवा ...."
रविवार, १३ जून, २०२१
रोजनिशीतलं काम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा