तर त्याच असं झालं कि माझ्या पायांना आणि पायांच्या नसांना जरा काहीतरी कमी पडतंय असं मला सतत जाणवत होत. म्हणून मधे माझे जे विविध प्रयोग सुरूच असतात त्यात आधी आमच्या शेजारीच एक कॉलेज आहे तिथल्या तज्ञांना विचारलं, त्यांनी मला त्यांच्या वरिष्ठांकडे धाडलं, त्यांना सगळं साग्रसंगीत समजावून सांगितल्यावर, सगळे रिपोर्ट्स दाखवल्यावर त्यांनी भली मोठी यादी दिली. मी मोठ्या मुश्किलीने तो फॉलो करण्याचा प्रयन्त केला पण "सगळं मुसळ केरात", दोनदा भेट घेतली, हू म्हणून फी दिली, पण त्या थोड्याश्या विचित्र सजेशन मुळे मी सरते शेवटी माघार घेतली.
मग माझ्या मैत्रिणीला परवा फोन केला आणि ऑनलाईन सल्ला देणार का हे विचारलं, ती हो म्हटली, ताबडतोब आम्ही बोललो आणि तिने अप्रतिम, सुंदर, भन्नाट, अतिशय सोप्पा, भला मोठा, दोन पण भर असा जबरदस्त "डाएट-चार्ट" पाठवला. तो बघूनच मी प्रेमात पडले, आवडला मला त्याचा सोप्पेपणा आणि तिची कलात्मकता असा सोप्पा प्लॅन तय्यार करण्याबद्दल. "पायासाठी काय पण" हे जरी खरं असलं तरी देखील थोडी काय भन्नाट मज्जा आली पाहिजे ना त्या "डाएट-चार्ट" च अनुसरण करतांना. काहीही गरज नसतांना माझी लेक पण म्हणाली कि "मम्मा सध्या मी घरी आहे तर मी पण करू?" मी ताबडतोब हो म्हटले, पण मला कारण समजलं नाही. आणि मी विचारलं देखील नाही, म्हटलं कळेलच लवकर. आणि तस्संच झालं. आज ती म्हणते कशी, "मम्मा हे डाएट म्हणजे किती विविध चविष्ट पदार्थ खायला मिळतात ना?" म्हटलं "हो कि". हि माझी डॉक्टर मैत्रीण आहेच तशी, फार सोप्प, अतिशय उपयोगी आणि करायला साधं पण विविधता असलेल्या गोष्टी सुचवते. मला, लेकीला, माझ्या पायांच्या नसांना मज्जा आली म्हणजे फावलं सगळं. त्या मुळे फारच विरुद्धार्थी अर्थ उमगला आम्हाला डाएट ह्या शब्दाचा आज, जास्त विविध पौष्टिक प्रकार प्रमाणात खाणे, हा. जबरदस्त.
तुम्हाला पण असेच विविध पौष्टिक प्रकार प्रमाणात सेवन करायचे असतील तर नक्की कळवा हं मंडळी, मी तुम्हाला डॉ. ज्ञानदा चा नंबर ताबडतोब कळवते.
#dr.dyanada #diet #diet-plan #variety-of-food #healthy-options #easy-to-follow #wonderful-change #healthy-intake #effective #happy #healthy
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा