हि सप्टेंबर २०१७ ची गोष्ट आहे. एक दिवशी एक तरुण मुलगी आली माझ्या केबिन मधे अचानक. त्या आधी अनेक जण होते माझ्या आजूबाजूला. ती शांतपणे थांबून राहिली आणि माझ्या आजूबाजूची गर्दी ओसरल्यावर आली माझ्या जवळ आणि एकदम मान हलवत म्हणते कशी सही हवी आहे मॅडम तुमची, मी "जुनिअर रिसर्च फेलो (JRF)" आहे. आणि सही साठी कागद पुढे केला. मी वाचायला घेतला आणि त्यांना बसायची खूण केली. छोटासाच फॉर्म होता त्यामुळे पट्टाकिनी वाचून झाला / नजर फिरवून झाला. मग मी म्हटलं काय करायचं ठरवलं आहे तुम्ही ह्या संशोधनात?. थोडक्यात, पट्टाकिनी, सरळ आणि अभ्यासपूर्वक उत्तर मिळालं, नवीन ताजा विषय होता. मग मी माझी थोडी पार्श्वभूमी सांगितली, अजून काय करता येऊ शकत ते सांगितलं आणि सही दिली. बाप रे हे सगळे इतके फटाफट झाले कि आज पण मला माहित नाही, मी विचारल पण नाही कि त्या अचानक माझ्या कडे आल्या कश्या? तिथून जो जोरदार प्रवास सुरु झाला, अहाहा, ज्याचं नाव ते. "जुनिअर रिसर्च फेलो" ते "सिनिअर रिसर्च फेलो (SRF)" ते PhD हा जंगी प्रवास होता.
८ जुलै २०२१ ला त्यांच एक पर्व संपुष्टात आलं आणि दोन नवीन प्रवास सुरु झाले, एक त्यांच्या संशोधन पूर्ण केल्यानंतरचा आणि दुसरा मला आता विद्यावाचस्पती अर्चना ह्यांच्या सोबत पुढे अगणित काम करायचे आहे त्याबद्दलचा.
ह्या २०१७-२०२१ च्या कालावधीत आम्ही खाचखळगे अनुभवले, उंच भरारी पण मारली, अनेक लेख लिहिले, काही प्रसिद्ध झाले कारण ते आवडण्यासारखे लिहिले गेले होते, आणि बरेचसे आवडले नाहीत पण... पण खूप शिकायला मिळालं, एकत्र वाटचाल खूप आठवणी, शिकवणी देऊन गेली हे मात्र नक्की. अनेक नवीन गोष्टी प्रथम केल्या, जसे दोन पेटंट्स लिहिले, प्रसिद्ध पण झाले, अमेरिकेची वारी झाली कारण मायक्रोसॉफ्ट ला आमचं कार्य आवडलं आणि त्यांनी आम्हाला अनुदान दिले, एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क चार दा, शिवाय आमच्या संशोधनावर लेख प्रसिद्ध केला ई.
विद्यावाचस्पती अर्चना साठी पण हा प्रवास फार सोप्पा होता असे नाहीच, कारण उच्च मध्यमवर्गीय गृहिणी आणि आईला सर्व सांभाळून, खूप गोष्टी प्रथम करायच्या होत्या, इंग्लिश ह्या भाषेत सहज सुलभ गोष्ट जगाला पटेल अशा भाषेत प्रत्येक लेखात मांडायची होती, नवीन संगणकाची भाषा आणि इतर लागणाऱ्या गोष्टी शिकायच्या होत्या, पण हे आणि इतर बरेच काही अगदी हसत त्यांनी वेळेत उभं केलंच. त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला आणि सुसांगतेला माझा सलाम. सर्व मुली ज्या संशोधन कार्यात येऊ इच्छितात त्यांना खूप शिकण्यासारखं आहे अर्चना कडून.
मला प्रत्येक पदोपदी त्यांची संशोधन कार्याशिवाय प्रत्येक कामात ह्या कालावधीत बहुमोलाची मदत झाली. कुठलंही काम असू दे फक्त सांगायचं, झालच म्हणून समजा. "वेळेचं गणित" सांभाळण्याची, माणसं संभाळणायची शिस्त वाखाणण्यासारखी आहे अर्चनाची. कदाचित ह्या सगळ्या गुणांमुळेच त्यांना हे यश प्राप्त झालं.
खूप कमी विद्यार्थ्यांना नक्की संशोधन काय करायचं आहे हे स्पष्ट नसतं, असलंच तर कसे करायचे ते ठरलेलं नसतं, वेळ पाळणं अवघड होत बहुतेक वेळा ई. पण सुस्पष्ट प्लॅन, झोकून द्यायची तय्यारी, वेळेच्या आत सगळी काम, ऐकणं सांगितलेलं, ग्रँट्स वेळेत पूर्ण करणं, नवीन गोष्टी पटापट आत्मसात करणं, अमेरिका वारी आणि तेथे कामामुळे विद्यालयांचं नाव करणं, दोन पेटंट्स आणि अनेक एकामागून एक साध्य झाल्या जणूकाही झंझावातच.
डॉ. अर्चनाची अशीच सतत प्रगती होऊ दे हि ईशचरणी प्रार्थना.
#Symbiosis #Symbiosis-university #PhD #JRF #SRF #AzureGrant #Microsoft #AI4Earth #Publications #Patents #PhDJourney
Great story.
उत्तर द्याहटवाNice written 👍,Yes Archana is deserving person ✔️
उत्तर द्याहटवाVery nice.. best wishes to both of you!
उत्तर द्याहटवाExcellent
उत्तर द्याहटवाYes, Archana ma'am deserves this.
उत्तर द्याहटवाCongratulations Dr. Archana and her guide Dr. Preeti Mulay ma'am.
उत्तर द्याहटवाThank you so much Pooja, Aditya and all others for your likes and comments. Really appreciate it.
हटवाCongratulations Archana Mam🎉🎊. Such a nice article written by Preeti Mam.
उत्तर द्याहटवाgreat story
उत्तर द्याहटवाCongratulations Dr preeti and Dr Archana
उत्तर द्याहटवाChhan
उत्तर द्याहटवाCongrats
Nicely written 👌🏻Congratulations Archana👍🏻 u are always best😀
उत्तर द्याहटवाGreat story.congratulatios Dr.Archana
उत्तर द्याहटवाWell done to the student and the guide... 👏👏👏 Perseverance and passion always pays!!
उत्तर द्याहटवाCongratulations Dr. Archana madam. Great story.
उत्तर द्याहटवाCongratulations Dr Archana madam
उत्तर द्याहटवाGreat work done by both of you.
उत्तर द्याहटवाCongrats and All the best for your future journey
Congratulations and best of luck!
उत्तर द्याहटवाSnehal, Yash, R G C, Komal, Jayant and all others thank you so much for your replies,thank you for going through this blog post and for your reply and wishes to both of us.
उत्तर द्याहटवाVery well written Preeti
उत्तर द्याहटवाखूपच छान मॅडम! गुरू आणि शिष्य दोघांच पण खुप खुप अभिनंदन
उत्तर द्याहटवाThank you so much Deshpande sir, for taking out time to read immediately and for your wishes too.
हटवाAmazing story
उत्तर द्याहटवाThank you so much for your sweet reply, means a lot to me.
उत्तर द्याहटवाA journey of four years of research but in its wake lies a tale of passion, sacrifice,devotion involvement...
उत्तर द्याहटवाWell scripted and much to imbibe from.
Thank you so much for taking out time to comment. Very valuable indeed.
हटवा