सोमवार, ५ जुलै, २०२१

दोन नवशिखे एका रस्त्यावर

आमच्या घरासमोरच्या गुळगुळीत नवीन रस्त्यामुळे अनेकांचा उत्साह शिगेला पोचला आहे. सगळेच उतरलेत मैदानात कधी नव्हे ते. दोघांबद्दल आज जे निरीक्षण केलं ते लिहावं असं वाटलं, म्हणून उठवलं गुगल ला आणि सुरवात केलीच.

आमच्या घरासमोर एक टिंगूमामा राहतो. कोणीही प्रेमात पडेल अश्या रस्त्याच्या, मग तो काय मागे राहतो होय? त्याने पण सुरवात केली सायकल शिकायला, त्याच्यापेक्षा उंच, जड आणि जेन्टस मधल्या दांड्याची जुन्या पद्धतीची अशी
सायकल घेऊन. देवा, आपलं वय काय, उंची ती किती आणि आपण कुठल्या सायकलचा वापर करतो आहे? "अशुद्ध आणि अवघड" असो. मी बघ्याची भुमिका निभावली गेले कित्येक दिवस, का म्हणताय? सांगते. तो टिंगूमामा सुटलाय नुसता, बेसिक सायकल झाली शिकून, आता हळूच दांड्यावरून पाय, मग एक हात सोड, मग टाळी वाजवा, मग दोन्ही हात सोड, गाणंच म्हण, झिगझ्याग इस्टाईल मधे वेगाने चालव, असे अनेक प्रयोग चालले असतात साहेबांचे सुसाट.

त्यात "मन उधाण वाऱ्याचे" म्हणत भलीमोठी जड ज्युपिटर घेऊन निघाल्या आमच्या कन्यका त्याच रस्त्यावर, त्याच वेळी. बापरे, दोघे पण बहाद्दर, एक ऐकायला तय्यार नाहीच. थांबायला पण नाहीच. मी फक्त श्वास चालू ठेवते.

पण आज मी स्वतःलाच समजावलं, हे पाहायला गेलं तर खरं शिकणं, नाही का, कोणास ठाऊक जेव्हा प्रत्यक्ष रस्त्यावर हे गाडी चालवणार तेव्हा कोण कुठले कसले बहाद्दर असणार आजूबाजूला  / डाव्या - उजव्या बाजूला. हा विचार मनात आला आणि मज्जा आली, शांत वाटलं. "होऊन जाऊ दे" असं म्हणावसं वाटलं, पण हसून सोडून दिल मी ते.

प्रत्येक दिवस आणि अगदी छोटेखानी प्रसंग देखील मज्जा देऊन जातो मला, आणि हो अर्थातच अनुकथा लिहायला एक विषय, ताजातवाना कोरा-करकरती पण छोटासा, भन्नाट. 

#anukatha #cycle #Jupiter #scooter #learning-driving #learning-riding-cycle #stunts #speed #tricks #same-road #share-road #same-time #new-comers #attraction-of-road #real-time-learning #learning-on-road  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...