आज सकाळी थोडीशी आवारासावरी करत असतांना कॉफी टेबल वर गोष्टी मी एकावर एक रचून ठेवल्या. त्या लगोरीत सगळ्यात वर माझा ऑफिस ला न्यायाचा स्टील चा डब्बा होता. सहज मनात विचार आला अरे जर धक्का लागलाच तर हा डब्बा पडेल आणि त्याला पोचा येईल.
मग लक्षात आलं कि अनेक वर्षात मी पोचा आलेलं भांड बघितलंच नाही. कारण अनेक आहेत. कारण सध्या चा जमाना हा नॉन-स्टिक चा, काचेचा आहे, अल्युमिनियम / हिंडालियम, पितळ, स्टील हे फार कमी झालाय वापरणं. त्यात आजकालच्या फारश्या इतक्या नाजुक आहेत कि भांड हातातून जर चुकूनमाकून पडलंच / निसटलंच तर त्या फरशीला छोटासा तडा जातो. आधीच्या फारश्या अतिशय दणकट / दगडी जणू आणि त्यात जुने भांडे, म्हणून पोचा प्रकार होता. आता काय १८-२० वर्षा पूर्वीच मी अमेरिकेत असा भांड्यांचा सेट घेतला होता जो जाड काचेचा होता आणि थ्री-इन-वन अश्या स्वभावाचा होता. त्यात नेहेमीच्या भांड्यांप्रमाणे गॅस वर ठेवून शिजवता यायचं, दिसायला एवढा देखणा होता कि कि डायनिंग टेबल वर ठेवता यायचा आणि मिक्रोवेव्ह मध्ये सुद्धा, धुवायला अगदी सोप्पा. भारतात उत्तम दर्जाचे नॉन-स्टिक भांडी आहेत त्या पण व्यवस्थित जाड असतात च. त्यामुळे माझ्या मुलांनी पोचा ना बघितला ना ऐकला. स्नानगृहात पण आजकाल रंगीबेरंगी प्लास्टिकचे मग्गे असतात त्यामुळे हातातून तांब्या निसटला आहे आणि त्याला अनंत पोचे पडले आहेत असं होतच नाही, किंवा सगळ्यांचा शॉवर जास्त प्रिय.
आणखीन एक पैलू म्हणजे आजकाल सगळे इतके सौरटेड आणि क्लिअर आहेत ना त्यामुळे आधी ऐकिवात येणारे प्रसंग आता होत नाहितच, जसे कि राग आला आणि फुलपात्र / पेला फेकून मारला आणि त्यामुळे पोचा आला, छे. नॉनस्टिक भांड्यांचा स्वभाव आत्मसात झाला आहे नकळत सगळ्यांना काहीही चिटकून घ्यायचं नाहीच अंगाला, पण झटपट चविष्ट पदार्थ पण तय्यार होणार त्याच बरोबर. मज्जा आहे कि नाही.
आणि अर्थात पोचा आलेली भांडी घरात ठेऊ नयेत असं पण म्हटलं जायचं, ऐकलं आहे मी. त्यामुळे बरंच बरं कि, पोचेच येत नाहीत तर तसली भांडी ठेवणं वगैरे फारच दुरची गोष्ट झाली आजकाल. जे होत ते योग्यच.
लेक समोरच होती, तिला मग मी मनात आलेलं सांगितलं, तर म्हणते कशी आधी "मला माहिती आहे मम्मा पोछा म्हणजे काय", देवा, कुठे पोछा आणि कुठे तो पोचा. मग म्हणाली "ओह यू मिन डेन्ट", म्हटलं जाऊ च दे.
तर हि अशी पोच्याची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.
शुक्रवार, १६ जुलै, २०२१
पोचा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा