आधी, म्हणजे माझ्या लहानपणीपासून ते माझी मुलं लहान असे पर्यंत ठराविक महिन्याच्या सामानात भागायचं, पण आता घोडी झालीत, थोडीशी ऐकण्याच्या पलिकडे आणि त्याचमुळे एकदा बसून यादी करून महिन्याचं सामान आणणं मला तरी अवघड वाटतंय. एका पेक्षा जास्त वेळा कधी कधी मागवावंच लागत. उदाहरणार्थ, आज सकाळी न्याहारीला आणि संध्याकाळच्या नाश्त्याला कुठलाच एक पदार्थ ठरत नव्हता आमच्या चौघांमधे. मग काय, म्हटलं चला होऊन जाऊ दे. तीन पदार्थ सकाळी आणि दुसरे तीन संध्याकाळी आमच्या चौघांमधे, देवा. होत कधी कधी. मूड असतो एखादी गोष्ट खायचा त्या दिवशी मग का नाही. आणि म्हणूनच मी म्हणते कि महिन्याचं सामान एकदा ऑर्डर करून जमत नाही, थोडसं इकडे तिकडे होतच. जर आम्ही सगळे चौघे आपापल्या कचेरीत, शाळेत गेलो असतो नॉर्मल दिवसांमधे, तेव्हा सवड पण नसते वैविध्य पदार्थ सकाळच्या घाईत करायला आणि ठराविक डब्बा घेऊन जातो माणूस. पण आता तसं नाही ना, सगळेच घरी आहेत, नाही म्हटलं तरी कामाचं स्वरूप आणि व्याप वाढला आहे, त्यामुळे भूक लागते, किंवा काही तरी वेगवेगळं खावंसं वाटत, बाहेरच खूप आणणं होत नाही, त्या मुळे पण मग सगळं घरीच करावं लागत आणि जास्त सामान वापरलं जाताच. पण मज्जा किती येते.
त्यामुळे म्हटलं "आली लहर आणि केला कहर", एखादा पदार्थ खायची इच्छा होणं ठीक आहे हो, पण हा तर कहर झाला आज. अर्थात मुलं मोठी झाल्यामुळे सगळं करण्याचं, चवीचं माझ्या डोक्यावर नाही, पण तरीही हे पंचतारांकित ठिकाणासारखं झालं.
#choice-of-breakfast #surge #feel #5-star-platter #monthly-grocery #WFH #more-work #no-outside-food #cook-at-home #breakfast #evening-snacks #independent-kids #grown-up-kids #kids-cooking
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा