मी आईबरोबर दर गुरुवारी आणि रविवारी भजनाच्या कार्यक्रमाला आणि "श्री. गुरुचरित्र" साखळी पारायणाला जात असे, प्रत्येक वेळी. कारण त्यावेळी मी फारच लहान होते, सगळीकडे हक्काची आणि व्यवस्थित यथेच्छ ताव मारणारी कुमारीका म्हणून ई. असो.
असेच एका गुरुवारी मी भजनाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि तेथे एक ताई होती जिने काहीतरी भन्नाट वेगळं परिधान केलं होत. मी खूप वेळ निरीक्षण करत होते कारण तसं मी कधीच बघितलं नव्हतं आत्ता पर्यंत. तिला विचारलं तर म्हणते ह्याला "कफ्तान" म्हणतात. हा एक गाऊन चाच प्रकार आहे, पण खासियत अशी कि भल्या मोठ्या भाया असतात आणि फक्त दोन शिवणीत शिवलेला, फ्री साईज, मोकळा-ढोकळा असा प्रकार. अहाहा, बघता क्षणी मला तेव्हा भलताच आवडला होता. झटपट गळ्यातुन घालायचं, मधे छोटीशी नाडी बास, आणि लागा कामाला किंवा आराम करा.
मी इतकी प्रेमात पडलेली बघून असेल कदाचित, पुढल्या आठवड्यात मी त्यांच्याच कडे गेले भजनाला पुन्हा तर माझ्या साठी अत्यंत अनोखं सरप्राईझ होत. मिनिएचर प्रतिकृती त्या "कफ्तान" ची. मी तर अक्षरश: निःशब्द झाले, कधीही मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं. ती ताई इतकी उंच त्यामुळे तिला तो "कफ्तान" शोभत होता आणि त्या भल्या मोठया भाया, शिवणाबाहेरची मोठी कपड्याची झालर, एकसारखी वरपासून खाल पर्यंत (खांद्यापासून ते पायापर्यंत), सगळंच. वा वा. हि छोटी आवृत्ती पण भन्नाट होती, त्यानंतर मी किती दिवस / महिने तो वापरला असेल कौतुकाने माझं मलाच माहिती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न मागता मिळालेली ती अनोखी भेट आज पण माझ्या डोळ्यासमोर उभी ठाकली आहे.
आज हे लहिण्यामागचं कारण, सांगते. आज संध्याकाळी मी आमच्या गेट पाशी उभी असतांना, माझ्या शेजारणीशी बोलत असतांना एक तरुण मुलगी कुठून तरी बाहेरून येत होती, पायी आणि तिने जीन्स वर कुर्ता असा कफ्तान सारखा घातला होता. बास. त्याच क्षणी झर्कर सगळं माझ्या डोळ्यासमोरून गेलं लहानपण आणि तो प्रसंग आणि तो मी येथे उतरवला पण. अजूनही अबाधित आहे त्या "कफ्तान" ची फॅशन हे बघून अत्यानंद झाला मला.
#memories #kaftan #gown #night-dress #different-night-dress #intact-fashion #easy-to-stitch #easy-to-wear #free-size
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा