गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

"मी" / "स्वाभिमानाची ऐसी कि तैसी"

३०-३५ वर्षा पुर्वीची हि गोष्ट आहे एका उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातली. एका कुटुंबात ५ भावंड, ३ भाऊ, दोन बहिणी आणि दुसरे छोटेखानी असे. त्यातल्याच एका तरुण मुलाचे आणि मुलीचे लग्न झाले, पहिले काही दिवस / महिने बरे गेले. त्यानंतर मोठ्या भावाच्या सासरकडून काही वस्तू भेट दिल्या गेल्या मोठ्या भावाला जावई म्हणून. ह्या धाकट्या मुलाला त्या वेळी त्याच्या सासरकडून काही नाही मिळालं. पण अधे मधे प्रसंगानुसार कर्तव्य म्हणून काही वस्तू मिळत होत्याच. रीत आहे ती. ज्या भावाला सतत भेट वस्तू मिळत असतं त्याची बायको घरीच असे. ज्याला मिळत नव्हते त्याची बायको पहिल्या दिवशीपासून नोकरी करणारी. असो.

त्या छोट्याश्या प्रसंगापासून म्हणायला हरकत नाही ते आज पर्यंत, इतकी वर्ष सतत तो धाकटा ह्या अपमाना बद्दल फार बोलत राहिला त्याच्या घरी सर्वांना आणि नाराज राहिला. मागच्या २ वर्षांपूर्वी ह्या नाराज नवऱ्याला मुली ची वडिलोपार्जित संपत्ती मिळाली, थोडीशी होती पण मिळाली. जेव्हा संपत्ती मिळाली तेव्हा पहिले दोन दिवस स्वारी खुश, पण तिसऱ्या दिवशी नवीनच नाटक सुरु झालं. "मी कधीच कोणाचं काही घेत नसतो, घेतलं नाही, मागत नाही, अपेक्षा नाहीतच आणि मला आवडतंच नाही ऐकायला कि मला कोणी काही दिलं. मी समर्थ आहे, मी हे, मी  ते....".

हि गोष्ट ऐकल्यावर मी उडालेच. इतकी वर्ष बायकोचे कमावलेले पैसे वापरायला मग का काही नाही वाटलं ह्या धाकट्याला? बायकोला का छोटे छोटे खर्च करण्यास भाग पाडलं धाकट्याने? छोटे छोटे ह्या करता कारण त्याच्या मानाने ती चा पगार छोटा होता, पण ते खर्च डोईजड होते तिला. कुठे गेले होते त्याचे शब्द तेव्हा? वागण्यात कुठेही अजिबातच स्थिरता नाही, सारखी धांधर धांधर....

"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले".

अध्यात्माचा सोडाच, पण साधा माणुसकीचा पाया कसा नाही अजिबातच?

ज्याला दरमहिन्याचा पगार, संपत्ती ई. पण महत्वाचं नाही, पण छोटे गिफ्ट्स हवे आहेत, ते दिलेले असतांना सतत "बिनवातीच्या फटाक्या सारखं" राहायचं, हे सगळं तर माझ्या विचारा पल्याड आहे. मला संपूर्ण सत्य माहित नाही, माहिती करून घ्यायचं नाही, पण ती आणि मुलं अतिशय सॉर्टेड आहेत, हुशार आहेत, साधे आहेत आणि ते हे सगळं सोडून देतात, हे बघून धन्य वाटलं आणि थोडक्यात लिहावसं देखील. दोन शीर्षक सुचले, म्हटलं असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...