गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

आफ्टर इफेक्ट

माझ्या लहानपणी मी आगगाडीने भरपूर प्रवास केला आहे. आगगाडीचा प्रवास म्हणजे एक रात्रीचा असा. त्यामुळे प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी घरी किंवा जेथे पोचलो तेथे पुढच्या दिवशी देखील "तो" परिणाम टिकायचा, असं वाटायचं कि अजूनही रेल्वे चालूच आहे किंवा हालल्या हालल्या सारखं वाटायचं उगाचच, मला तरी.

प्रवास संपला असला तरी प्रवासाची मज्जा टिकून राहायची पुढे देखील, जवळपास एक अख्खा दिवस. छान होत ते फिलिंग, मला आवडायचं. तेव्हा मला तरी सगळंच आवडायचं, त्यातलं हे एक.

गेले दोन एक वर्ष माझी टप्प्याटप्प्यात फिसिओथेरपी चालू आहेच, त्यात एक IFT नावाचा प्रकार असतो, लै भारी, दुखणं एकदमच छू मंतर, एक वेगळीच जादू आहे. माझी तर ब्रह्मानंदी टाळीच लागते त्या IFT च्या मुंग्या चालू लागल्या कि. अहाहा. आणि तो ठराविक वेळ ट्रिटमेण्ट चा संपला तरी देखील अनेक मिनिट पुढे मुंग्या अजूनदेखील चालत आहेत असे वाटतेच. 

प्रत्येक IFT च्या वेळी मला विविध वेळा आगगाडीने केलेला प्रवास आणि त्यानंतरचा तो भावविभूर अनुभव डोळ्यासमोर उभा ठाकतोच.

"आफ्टर इफेक्ट" मुळे कदाचित जास्त पट्टाकिनी बरं होत असं वाटत मला, कारण ती अनुभूतीच फार काही देऊन जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...