मी दोन तीन वेळा तरी हे बघितलं आहे आणि तेव्हा माझ्या कुतुहलाला पारावर उरला नाही. हे का? हे अजून पर्यंत मला समजले नाहीच. एक दोन दुकानांमधें नॉर्मल दिवस असतांना मी गेले होते तेव्हा, आणि कुणाच्या तरी छोटेखानी ऑफिस मधे हे मी बघितलेलं मला पक्क आठवतं आहे.
मर्सिडीज हि एक महान गाड्यांची कंपनी जगजाहीर आहे. अतिशय उच्च दर्जाच्या गाड्या तय्यार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचा जो लोगो आहे त्यात एक चांदीच्या रंगाचा गोल आकार आणि त्यात तीन एक सारख्या अंतरावर असलेल्या ओळी / रेषा ई. आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा कि ह्या धरती, समुद्र आणि हवा अश्या तीन तत्वांची ताकद आहे मर्सिडीज च्या इंजिन मधे जे डाइमलर च आहे. ई.
हे अतिशय वाखाणण्याजोगं तत्व असलेले लोगो मला दृष्टी पथात आले. एखादी वस्तू एकदा का बाजारात आली, त्याची किंमत थोडीशी वाजवी असली कि ती इतक्या ठिकाणी / ठिकठिकाणी दिसू लागते कि ज्याचं नाव ते. तर ह्या मोठ्या कंपनीसारखा दिसणारा छोटासा लोगो काही चाकांवर दिसला. प्लास्टिक चे रॅक होते ते, ज्यात तीन / चार खाणे होते आणि त्या रॅक ला चार चाक, इकडे तिकडे न्यायला आणि त्या चाकांवर हा च लोगो. . बाप रे मी उडालेच, हे काय, काय गरज आहे असले भलते सलते कॉपी करायची. कुठे मुळ ताकदवर चाक, ती गाडी आणि ती कंपनी आणि कुठे हि तकलादू चाक / वस्तू. कॉपी करणाऱ्याला पण का$$$$ही वाटत नाही. लोगो ची गरज आहे का त्या नकट्या चाकांना? काहीही म्हणजे काहीही करत राहायचं. कोणाच्या सुपीक डोक्यातून आली आहे कि कल्पना, कोणास ठाऊक. असो. पण त्यामुळे मला हा छोटेखानी लेख लिहिता आला न, हे हि नसे थोडके. कदाचित त्या सुपीक डोक्यानी विचार केला असेल कि असली तर घेणं शक्य नाही ह्या जन्मी, हे नकली तरी घ्यावं. असो. वेगळी मज्जा आली हे अनुभवतांना आणि शब्द पेरतांना सुद्धा.
Please read more about the concept behind the logo: https://www.mbontario.com/mercedes-benz-logo-meaning/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा