गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अनोखी फॅशन

आम्ही अनेक वर्षांपूर्वी एका ट्रिप ला गेलो होतो. तेथे एक वेगळीच, म्हणजे फारच वेगळी फॅशन दृष्टीपथात पडली. आणि मला प्रचंड आवडली देखील. पण अर्थात त्या जगावेगळ्या फॅशन बद्दल मी विसरले / विसमूर्तीत गेलं पूर्णपणे.

ह्या वर्षी माझ्या वाढदिवसाला मला सरप्राईझ देण्या करता माझ्या मुलांनी ऑनलाईन काही भेट वस्तू मागवल्या. त्या भेट वस्तू शोधतांना त्यांना अजून एक छोटीशी आणि मला सध्या आवश्यक असलेली वस्तू दिसली. अर्थात ती भेट नाही. मग काय एक एक वस्तू येत गेल्या आणि माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. सरते शेवटी हि जास्तीची वस्तू आली एकदाची आणि जो हशा पिकाला. पोट दुखेस्तोवर सगळे लोटपोट झालो. देवा. हिच तर खासियत आहे ऑनलाईन शॉपिंग करण्याची, गम्मत. होत असं कधी कधी, आणि व्हायलाच पाहिजे. जगावेगळी वस्तू. आणि आम्ही परत काही केली नाही, ठेवली भन्नाट आठवण म्हणून.

समुद्र किनारी सहसा वापरतात अशी अनोखी कलिंगड च्या फोडी चे फोटो / चित्र असलेली खास सपाता पण मागवली पोरांनी. संगणकाच्या स्क्रीन वर ती खूप छान वाटली. पण प्रत्यक्षात एक चप्पल पिवळ्या रंगाच्या पार्श्वभूमीची आणि दुसरी पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीची आणि त्यावर कलिंगडाच्या फोडी अशी डिलिव्हर झाली. देवा. आणि अगदी अशीच विजोड चप्पल जी जोरदार फॅशन मधे होती ती मी / आम्ही पाहिली होती अनेक वर्षांपूर्वी आणि आता तशातली एक मला आता वापरायला मिळते आहे, म्हणजे किती मज्जा. बघा न एकसारखी चप्पल / सपाता घालण्यात आयुष्य गेलं आता तरी नको का काही आपल्याच घरी वेगळं करायला. वा वा, ज्याच्या कोणामुळे हि चूक झाली आहे पाठवण्यात त्याला शतश: धन्यवाद. माझी अनोखी फॅशन मी फुल्टू एन्जॉय करते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...