आज फिजिओथेरपी घेऊन परत येतांना मी माझी ऑटो रिक्षा राईड प्रचंड एन्जॉय करत होते, कारण पोटातलं पाणी देखील हालत नव्हतं. इतकी नव्वी कोरी रिक्षा होती म्हणून सांगते, कि जशी काही आत्ताच माझ्याच साठी शो रूम मधून बाहेर आली आहे. अर्थातच तो चालक पण लै भारी चालवत होता रिक्षा.
माझ्या घराच्या रस्त्यावर एक भेळ वाला आहे, ठेला आहे आणि तो चालू आहे. स्मार्ट पद्धतीने त्याने एक मराठी पाटी लावली आहे, कि "पार्सल सेवा सुरु" पण प्रत्यक्षात बरीच मंडळी घोळका करून खाणं एन्जॉय करत असतातच. आज पण त्या ठेल्यावर एक जण होते, बिच्चाऱ्याना भूक लागली असेल किंवा काही तरी बदल हवा असेल किंवा अजून काही कारण असेल. पण ते बघून मी पोट धरून हसले हो. खरं तर हसायला नको होत मी, पण... सॉरी. आता लहानपणी पासून माझ्या डोळ्यासमोर एक ठराविक छबी आहे त्या व्यवसायाची, त्यात रस्त्यावरच्या ठेल्यावर उभे राहून खाणं नाही आहे / नव्हतं. पण आता ह्या पुढे नाही हसणार, पक्के प्रॉमिस.
चक्क एक टिपिकल गुरुजी / पुजारी खात होते हो, आणि अचानक मला दिसले, त्या त्यांच्या पोषाखात. आणि ते माझ्या "गुरुजी" ह्या परिभाषेत नाही, पण असो. शेवटी ते पण एक माणूसच ना, हे मला समजायला हवं होत, आणि काय हरकत आहे. असो. खूप दिवसांनी / महिन्यांनी गुरुजी ना कामाला जाताना / येतांना बघून फार बरं वाटलं, सुरु झालं वाटतंय त्यांचं रुटीन. गुड.
गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१
गुरुजी एक माणुस च
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा