शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

छोटे आयुष्य

एका (कदाचित) अभ्यासु हस्तरेषा तज्ज्ञाने मला आपणहून माझं भविष्य सांगितलं. कदाचित तो फार पोचलेला होता ह्या क्षेत्रात कारण काही क्षणात त्याने खडान्खडा सगळं सांगितलं देखील. मी असं ऐकलं होत कि विचारल्याशिवाय बोलू नये आणि सगळं दिसलं तरी भान राखून बोलावं. असो.

तर माझ्या हातात म्हणे फार कष्ट लिहिले आहेत, फार ऍडजेस्ट करत च राहते म्हणे मी, प्रचंड पैसा आहे म्हणे (माझ्यापेक्षा त्याला माहिती हो), आणि प्रचंड पैसा असून देखील आयुष्य फारच छोटं आहे ई.

मी अगदी लहान असतांना माझे बाबा मोठ्या पदावर असल्यामुळे भरपूर मान / सन्मान मिळायचा त्यांना आणि गाड्या ड्राइवर चा ताफा घरासमोर उभा आमच्या नेहेमी. एकुलती लेक असल्यामुळे भरपूर लाड, प्रचंड खाण्याची मला आवड त्यामुळे भारतातीलच नव्हे तर कित्येक देशातले पदार्थ चाखायला मिळाले, भरपूर विविध देश दाखवले मला नवऱ्याने, दोन सोन्यासारखी लेकरं, PhD पर्यंतचा प्रवास, ह्या प्रवासाचे अनेक विदयार्थी साक्षीदार, भरपूर प्रेम करणारे काळजी करणारे मित्र-मैत्रिणीचा गोतावळा, सोज्वळ आणि जगावेगळे शेजारी, शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच ओळखी, भरपूर संशोधन पेपर्स, मराठीतल्या शेकडो छोट्या अनुकथा चं लिखाण, अर्धशतक पायावर उभं राहायला मिळणं, वैविध्य गाड्या चालवायला मिळणं, आणि हे सगळं मिळाल्याचं प्रचंड समाधान.  

आता तुम्ही मला सांगा FOXBASE, PASCAL, FORTRAN ते Python ह्या प्रवासाला छोटा कसं काय म्हणता येईल हो? मला तर नेहेमीच आश्चर्य वाटत कि लायकीपेक्षा जास्त दिलयं "त्याने", भरभरून, अगदी सुरवातीपासून, का?

आता ह्यापुढे प्रत्येक दिवस मौलिक, चेरी ऑन केक, जास्तीचा, जो संपूर्ण आनंदाने उपभोगायचा. त्याची शक्ती आणि दिशा पण तोच देणार कि हो, मी कोण?

२ टिप्पण्या:

  1. Long life or short life is not really the true worth of Life. Life's worth is not measured simply by Time but by the immensity of Time and frozen moments that remain eternal.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. True, very true. I was aware of the concept of living life to the fullest, every day is precious and what not but was not acting on it. Hence might be came across this personnel. Thanks to his inputs, it certainly helped to change my perspective. Thank you for your inputs sir, as always, means a lot to me.

      हटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...