काल सुट्टी म्हणून इडली चा बेत आखला मी. आदल्यादिवशी तांदूळ डाळ छान भिजत घातले, त्याचं पीठ तय्यार केलं आणि ते मस्त फुगून आलं सकाळी. त्याच्या जेव्हा इडल्या लावल्या कुकरला तेव्हा संपूर्ण घरात जो घमघमाट सुटला होता म्हणून सांगते, ज्याचं नाव ते. सहज मग मी बोलून गेले "हा तांदूळ किती चांगल्या प्रतीचा आहे नाही, भन्नाट सुगंध पसरला आहे".
त्या तांदळाला जाऊन सांगण्याची गरज पडली नाही कि मी किती चांगल्या प्रतीचा आहे तो, त्याचा सुगंध सगळं सांगून गेला आपोआप.
तसेच मी माझ्या विद्यार्थ्यांना सतत सांगत असते कि "तुमचं काम बोललं पाहिजे तुम्ही नाही / your work should speak about you, not you". त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला काल.
अर्थातच ज्या शेतकऱ्याने ते तांदळाचे पीक घेतलं असेल त्याने फारच मनापासून कष्ट केलेलं दिसले आणि त्यांच्या मुळे पोटभर तृप्त होईपर्यंत इडली फस्त केली आम्ही सर्वानी. तो सुगंध इतका अप्रतिम होता ना कि ज्याला भूक नसेल किंवा इडली आवडत नसेल तो देखील नक्की चाखून बघणार हे नक्की. ज्या ज्या कष्टकऱ्यांनी माझ्या इडली साठी काम केलं त्या सर्वांना धन्यवाद. अशीच माझ्या घरची, सर्वांच्या घरची ताटं नेहेमी भरलेली असो हिच प्रार्थना.
ज्या ज्या कष्टकऱ्यांनी माझ्या इडली साठी काम केलं त्या सर्वांना धन्यवाद. अशीच माझ्या घरची, सर्वांच्या घरची ताटं नेहेमी भरलेली असो हिच प्रार्थना.. very touching..
उत्तर द्याहटवाDirectly from heart and whatever I felt, thats it, straight and simple. Good you liked it.
उत्तर द्याहटवा